Atul Subhash : 10 लाख रुपये हुंडा, मारहाण अन् सासऱ्याची हत्या; पत्नीच्या आरोपांची यादीच समोर

Atul Subhash : 10 लाख रुपये हुंडा, मारहाण अन् सासऱ्याची हत्या; पत्नीच्या आरोपांची यादीच समोर

Atul Subhash : उत्तर प्रदेशातील एक AI इंजिनिअर अतुल सुभाषने (Atul Subhash ) पत्नीच्या जाचाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय. आत्महत्येपूर्वी या इंजिनिअरने 90 मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रकाशित करुन आपल्यासोबत घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती दिलीयं. यामध्ये आपल्या पतीने आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करुन आपल्याला फसवल्याचा आरोप इंजिनिअर अतुल सुभाषकडून करण्यात आलायं. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून ‘जस्टिस फॉर अतुल’ची हाक नेटकऱ्यांकडून दिली जात आहे. अशातच आता पत्नीकडून अतुलवर कोणते आरोप करण्यात आले होते, त्याची यादीच समोर आलीयं.

फडणवीसांच्या बंगल्यावर नाराजांचा ‘जनसागर’; उमेदवारी रद्द करण्यासाठी ‘आई’ ची धावाधाव

अतुल सुभाष यांचा विवाह 26 एप्रिल 2019 साली वाराणसीमधील हिंदुस्थान इंटरनॅशनल हॉटेलमध्ये थाटामाटात संपन्न झाला होता. लग्नानंतर अतुल सुभाषसह कुटुंबियांकडून पत्नीला हुंड्याच्या 10 लाख रुपयांची मागणी सातत्याने केली जात होती. तसेच अतुल मद्यपान करुन पत्नीला मारहाण करीत असल्याचा आरोप पत्नीकडून करण्यात आला होता. यासोबतच अनैसर्गिक कृत्य, पत्नीचा पगार आपल्या खात्यावर ट्रान्सफर करीत असत. अतुलच्या कुटुंबियांनी पत्नी निकीताच्या कुटुंबियांकडे 16 ऑगस्ट 2019 रोजी हुंड्यासाठीचे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नी निकीताच्या वडिलांचं मृत्यू झाला होता. तर 17 मे 2021 रोजी अतुलने पत्नीला मारहाण करुन घरातून बाहेर हाकलून दिले होते. त्यानंतर पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचं समोर आलंय.

बॉलिवूडमध्ये खळबळ, अभिनेता मुस्ताक खानचे अपहरण, ऑनलाइन खंडणी वसूल

पतीसह कुटुंबियांकडून पत्नी निकीताला त्रास होत असल्याने पत्नी निकीताने पोलिसांत आपली तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या कपड्यांची बॅग आणि कागदपत्रे आणून दिले. त्यानंतर पत्नी निकीता आपल्या माहेरी आईसोबत राहत असल्याची माहिती वृत्तसंस्थांकडून देण्यात आलीयं.

सुसाईडमध्ये व्यक्त केल्या इच्छा…
24 पानांच्या चिठ्ठीत अतुल सुभाष यांनी आपली एक इच्छा व्यक्त केलीयं. अतुल सुभाष यांच्याविरोधात सुरु असलेला खटला लाईव्ह झाला पाहिजे, कारण देशातल्या नागरिकांना कायदेशीर पद्धतीबाबत माहिती मिळेल. माझ्या मुलांची कस्टडी माझ्या परिवाराला देण्यात यावी, कारण माझे कुटुंबिय मुलांवर चांगले संस्कार करतील. अतुलच्या सासरकडील व्यक्तींना त्यांच्या मृतदेहाच्या जवळ येण्याची परवानगी दिली जाऊ नये. जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत माझ्या अस्थीचं विसर्जन करु नये, अशा इच्छा अतुल सभाष यांनी सुसाईड नोटमध्ये व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी पती अतुल सुभाषने प्रकाशित केलेल्या व्हिडिओमध्ये पत्नीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा पतीकडून करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु होती. या प्रकरणी मिटवण्यासाठी न्यायाधीशांकडूनही पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप अतुल सुभाषकडून व्हिडिओमध्ये करण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube