बॉलिवूडमध्ये खळबळ, अभिनेता मुस्ताक खानचे अपहरण, ऑनलाइन खंडणी वसूल

  • Written By: Published:
बॉलिवूडमध्ये खळबळ, अभिनेता मुस्ताक खानचे अपहरण, ऑनलाइन खंडणी वसूल

Actor Mushtaq Khan : बॉलिवूड अभिनेता मुस्ताक खानचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार अपहरणकर्त्यांनी अभिनेता मुस्ताक खानला बिजनौरमध्ये औलीस (Kidnapping) ठेवले होते. तसेच अपहरणकर्त्यांनी खंडणी म्हणून मुस्ताक खान (Mushtaq Khan) यांच्या मोबाईलवरून दोन लाख रूपये देखील ऑनलाइन ट्रान्सफर केले. या प्रकरणी अभिनेत्याच्या इव्हेंट मॅनेजरने मेरठमधील बिजनौर कोतवाली नगर येथील तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.  या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता मुस्ताक खानचा इव्हेंट मॅनेजर शिवम यादवने (Shivam Yadav) मेरठचा रहिवासी राहुल सैनी आणि अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी त्याला मेरठमधील एका कार्यक्रमाच्या नावावर फोन केला होता. या कार्यक्रमासाठी अभिनेता मुस्ताक खानला दिल्ली विमानतळावरून एका कॅबने रिसिव्ह केला मात्र त्यानंतर त्यांचे अपहरण करून एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर मुस्ताक खान कसं तरी तेथून वाचले आणि एका मशिदीत पोहोचले आणि तिकडून आपल्या कुटुंबीयांना कॉल केला आणि घरचे आल्यावर तिकडून मुंबईला आले.

अभिनेता मुस्ताक खानच्या इव्हेंट मॅनेजरने आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, 15 ऑक्टोबर 2024 रोजी राहुल सैनी नावाच्या व्यक्तीने मेरठ येथून फोन केला होता. ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात मुस्ताक खान यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सन्मान करण्यात यावा असं राहुल सैनीने फोनवर म्हटले होते. या कार्यक्रमासाठी राहुल सैनीने पैसे देखील दिले होते आणि 20 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट बुक देखील करण्यात आले होते.  20 नोव्हेंबर रोजी राहुल सैनीने अभिनेता मुस्ताक खान यांना दिल्ली विमानतळावरून एक कॅबने रिसिव्ह केले. या कॅबहुन मुस्ताक खान मेरठला जाणार होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुस्ताक खान यांना दिल्ली विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर दुसऱ्या कारमध्ये बसवले. या कारमध्ये आणखी दोन जण बसले होते. ज्यांना पाहून मुस्ताक खानने कारमध्ये बसण्यास नकार दिला मात्र त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आले आणि त्यांना थेट बिजनौरला आणले. अपहरणकर्त्यांनी मुस्ताक खानला बिजनौरच्या मोहल्ला चाहशिरी येथील घरात ओलीस ठेवले होते. आरोपी दारूच्या नशेत असताना मुस्ताक खान यांनी शांतपणे दरवाजा उघडला आणि बाहेर येऊन मशिदीत पोहोचले. तेथून त्यांनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

मोबाईलवरून खात्यात पैसे ट्रान्सफर 

मुस्ताक खानला जेव्हा ओलीस ठेवण्यात आले होते, तेव्हा अपहरणकर्त्यांनी त्याचा मोबाइल फोन घेऊन सुमारे दोन लाख रुपये एका खात्यात ट्रान्सफर केले होते, असं तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणात एसपी अभिषेक झा यांनी दिलेल्या माहितीनुसार एसपी अभिषेक झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट अभिनेता मुश्ताक मोहम्मद खानच्या इव्हेंट मॅनेजरने मेरठचा रहिवासी राहुल सैनी नावाच्या व्यक्तीविरुद्ध अपहरण, ओलीस ठेवणे आणि खंडणीची मागणी आणि खूनाचा प्रयत्नकरणे कलमांखाली तक्रार दाखल केली आहे.

सतीश वाघ प्रकरण, पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अपहरणकर्ते ताब्यात

सध्या याप्रकरणी चार पथके तयार करण्यात आली आहेत. अशी माहिती एसपी अभिषेक झा यांनी दिली. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन सुनील पाल यांचा देखील याच स्टाईलमध्ये किडनॅप केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या