शरद पवारांच्या पक्षाच्या माजी महापौरांवर अपहरण अन् मारहाणीचा गुन्हा; बचावासाठी खासदार लंके मैदानात

शरद पवारांच्या पक्षाच्या माजी महापौरांवर अपहरण अन् मारहाणीचा गुन्हा; बचावासाठी खासदार लंके मैदानात

case registered of kidnapping and assault against former mayor and Sharad Chandra Pawar NCP city president Abhishek Kalamkar : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बीडसह इतरही जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या मारहाण आणि अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता अहिल्यानगर शहरातून देखील अशीच बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये माजी महापौर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्लॅटिनमच्या नावाखाली दुबईहून भारतात होणाऱ्या सोनं तस्करीबाबात सरकारचा मोठा निर्णय

पिडीत व्यक्तीचा भावाने देखील याबाबत फिर्याद दिली आहे. तसेच रवींद्र रामराव शेळके यांच्या फिर्यादीवरून नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मच्छिंद्र झेंडे, अभिषेक कळमकर, लालू उर्फ अभिषेक जगताप, तसेच अनोळखी पाच इसमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये मच्छिंद्र झेंडे याला अटक देखील करण्यात आली आहे.

जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केलं, मंत्रिपदाची शपथ घेताच भुजबळांचा हल्लाबोल

दरम्यान या मारहाणी मागे आर्थिक कारण आणि कळमकर यांनी केलेले रयत शिक्षण संस्थेतील आर्थिक घोटाळे माहीत असल्याच्या कारणावरून ते कोणाला सांगू नये म्हणून अपहरण करून केली रवींद्र रामराव शेळके यांना मारहाण करण्यात आल्याचं बोललं जात आहे. तसेच रवींद्र रामराव शेळके हा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे होता दहा वर्षापासून चालक म्हणून कामाला होता. मात्र त्याने माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या पासून आपल्याला आणि कुटुंबाला धोका असल्याने शेळके यांनी केली पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली होती.

Pune News : चिखलीतील पडलेल्या 36 बंगल्यावाल्यांना बिल्डरने दिलं मोठं आश्वासन…

दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी अभिषेक कळमकर यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.यावर बोलताना लंके म्हणाले की, अभिषेक कळमकर यांच्या विरोधात वेगळ चित्र निर्माण केलं जात आहे. हा मारहाणीचा प्रकार नाही. तर संबंधित तरूण हा गेल्या अनेक वर्षांपासून कळमकरांकडे चालक म्हणून काम करत होता. मात्र त्याने नोकरी लावण्याचं अमिष दाखवून पैसे उकळलेले असल्याने त्याला कळमकरांनी कडक शब्दांत समज दिली. मात्र हा सर्व प्रकार उलटा दाखवला जात आहे. असं म्हणत लंकेंनी कळमकरांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube