प्लॅटिनमच्या नावाखाली दुबईहून भारतात होणाऱ्या सोनं तस्करीबाबात सरकारचा मोठा निर्णय

प्लॅटिनमच्या नावाखाली दुबईहून भारतात होणाऱ्या सोनं तस्करीबाबात सरकारचा मोठा निर्णय

Import Gold from Dubai : प्लॅटिनमच्या नावाखाली दुबईहून (Dubai) भारतात होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सोने आणि चांदीच्या न बनवलेल्या, अर्ध-निर्मित आणि पावडर स्वरूपातील आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे.

आयात केवळ नियुक्त एजन्सी, पात्र ज्वेलर्स आणि भारत-यूएई व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) अंतर्गत केली जाईल. सरकारने 99% किंवा त्याहून अधिक शुद्ध असलेल्या प्लॅटिनमसाठी स्वतंत्र एचएस कोड तयार केला आहे. यामुळे सोन्याला प्लॅटिनम घोषित करून तस्करी करण्याचा मार्ग बंद झाला आहे.

पाकिस्तान, तुर्कीनंतर आता चीन; भारताने चायनाला दिला मोठा दणका, वाचा, नक्की काय घडलं?

काही आयातदार दुबईतून शुद्ध सोने आयात करत होते आणि त्याला ‘प्लॅटिनम मिश्रधातू’ असे संबोधून कमी आयात शुल्क भरत होते. भारत-यूएई व्यापक आर्थिक भागीदारी करारांतर्गत कमी आयात शुल्काची सुविधा उपलब्ध होती. प्लॅटिनम मिश्रधातूच्या स्वरूपात भारतात सोने आणल्यानंतर, ते या धातूचे पुन्हा शुद्धीकरण करत होते आणि त्यातून सोने काढत होते आणि बाजारात विकत होते. काही प्लॅटिनम मिश्रधातूंमध्ये 90 टक्क्यांपर्यंत सोने असते.

“प्लॅटिनमच्या नावाखाली सोने आयात केले जाऊ नये यासाठी स्वतंत्र एचएस कोड तयार करण्याची अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या करारानुसार, भारताने टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत 1 टक्के टॅरिफ सवलतीसह युएईमधून दरवर्षी 200 मेट्रिक टन सोने आयात करण्याचे मान्य केले.

पुरुष प्रवासी दुबईहून भारतात सीमाशुल्क न भरता 20 ग्रॅम पर्यंत सोने नाणी आणि बारमध्ये आणू शकतात. महिला प्रवासी सीमाशुल्क न भरता दागिने, नाणी किंवा बारच्या स्वरूपात 40 ग्रॅमपर्यंत सोने आणू शकतात. 15 वर्षांखालील मुले दागिने, भेटवस्तू म्हणून 40 ग्रॅमपर्यंत सोने आणू शकतात. प्रवाशांकडे त्यांच्या सोन्याचा योग्य कागदोपत्री पुरावा असणे आवश्यक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube