क्रोम युजर्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, ‘हे’ काम करुन घ्या

Chrome Update : तुम्ही देखील गुगल क्रोमचा वापर संगणकावर किंवा लॅपटॉपवर करत असेल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. माहितीनुसार, सरकारी एजन्सी CERT-In ने गुगल क्रोमने (Chrome) युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. तसेच CERT-In ने टेक जायंटच्या वेब ब्राउझरमध्ये असलेल्या काही त्रुटींबद्दल देखील माहिती दिली आहे. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या लॅपटॉपमधून महत्त्वाचा डेटा चोरू शकतात.
क्रोममध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या आहेत?
CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या क्रोम ब्राउझरच्या जुन्या व्हर्जनमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्स वापरकर्त्यांच्या संगणकांवर सहज प्रवेश करू शकतात. एवढेच नाही तर ते व्हायरस चालवून तुमचे डिव्हाइस हॅक करू शकतात आणि डेटा देखील चोरू शकतात.
Chrome च्या कोणत्या व्हर्जनमध्ये बग आहेत?
जर तुम्ही विंडोजवर क्रोम वापरत असाल, तर हे बग 136.0.7103.114 च्या आधीच्या व्हर्जनमध्ये असतात.
जर तुम्ही मॅक किंवा लिनक्स वापरकर्ता असाल, तर हा बग 136.0.7103.113 च्या आधीच्या व्हर्जनमध्ये आहे.
कोणते बग समाविष्ट आहेत?
CERT-In ने अहवाल दिला आहे की गुगल क्रोमच्या जुन्या व्हर्जनमध्ये दोन बग आहेत. CVE-2025-4664: Chrome मधील हा बग ब्राउझरच्या लोडर धोरणाला योग्यरित्या लागू करत नाही. याच्या मदतीने हॅकर खास डिझाइन केलेल्या वेबसाइटद्वारे तुमच्या संगणकातून डेटा चोरू शकतो.
CVE-2025-4609: हा बग क्रोमच्या मोजो घटकात अस्तित्वात आहे, ज्यामुळे हाताळणीची समस्या निर्माण होते. याचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या सिस्टममध्ये प्रवेश करू शकतात.
संरक्षणासाठी काय करावे?
CERT-In ने क्रोम युजर्सला सांगितले आहे की या बग्स टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या सिस्टममध्ये नवीनतम क्रोम ब्राउझर वापरावा लागेल. यासाठी त्यांना क्रोम अपडेट करावे लागेल. येथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धत सांगत आहोत.
भारतीय वंशाच्या लोकांना होणार फायदा; गृहमंत्री अमित शाहने लाँच केले नवीन OCI पोर्टल
स्टेप 1 : तुमच्या संगणकावर क्रोम ब्राउझर उघडा.
स्टेप 2 : उजव्या बाजूला असलेल्या मेनू क्लिक करा.
स्टेप 3 : आता तुम्हाला हेल्प मध्ये About Google Chrome वर जावे लागेल.
स्टेप 4 : क्रोम ब्राउझर आपोआप अपडेट होण्यास सुरुवात होईल. अपडेट्स पूर्ण झाल्यावर तुमचा ब्राउझर रीस्टार्ट करा.