मोठी बातमी! 10 वर्षांनंतर गुगलने लोगो बदलला, नवीन लोगोमध्ये काय खास?

मोठी बातमी! 10 वर्षांनंतर गुगलने लोगो बदलला, नवीन लोगोमध्ये काय खास?

Googles Logo Changed After 10 Years : टेक जायंट गुगलने एका दशकाच्या म्हणजेच 10 वर्षांच्या कालावधीनंतर आपला लोगो बदलला आहे. गुगलचा (Google) आयकॉनिक जी आयकॉन आता बदलला आहे. हा फरक किरकोळ वाटत असला तरी, तो कंपनीच्या विचारसरणीला प्रतिबिंबित करतो की, ती आता एआयच्या जगात पूर्णपणे उतरण्यास तयार आहे. रिपोर्ट्सनुसार, गुगलने पुन्हा डिझाइन केलेले ‘G’ आयकॉन (Googles Logo) आणण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व गुगलच्या वार्षिक I/O 2025 डेव्हलपर कॉन्फरन्सच्या आधी घडत आहे, जो 20 मे रोजी प्रस्तावित आहे. ( Googles Logo Changed) पूर्वीच्या लोगोमध्ये सर्व रंग वेगवेगळे विभागले गेले होते, जे आता मिसळले गेले आहेत. यामध्ये लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग समाविष्ट आहे.

नवीन गुगल लोगो कुठे दिसेल?

रिपोर्ट्सनुसार नवीन ‘G’ आयकॉन आता नवीनतम गुगल सर्च अॅप अपडेटमध्ये लाइव्ह आहे. हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. असं म्हटलं जातंय की, गुगलचा नवीन ‘जी’ कंपनीचा एआयकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवितो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ओपनएआय आणि पर्प्लेक्सिटी सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी गुगल त्यांच्या जेमिनी एआयला सतत प्रगत करत आहे. ती तिच्या उत्पादनांमध्ये एआय वैशिष्ट्ये समाविष्ट करत आहे.

ब्रेकिंग : BCCI चा मोठा निर्णय; निवृ्ृतीनंतरही कोहली अन् रोहितला मिळणार A+ श्रेणीतील सुविधा

गुगलने शेवटी 2015 मध्ये त्यांच्या जी आयकॉनमध्ये मोठा बदल केला होता. त्यापूर्वी गुगल लोगोचा रंग निळा होता, जो बदलून मल्टीपल करण्यात आला होता. तथापी क्रोम, मॅप्स सारख्या इतर गुगल उत्पादनांचे लोगो बदलले आहेत की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. कंपनी त्यामध्ये ग्रेडियंट फिनिश देखील देऊ शकते, असं म्हटलं जातंय. गुगलचा नवीन लोगो सध्या फक्त गुगल सर्च अॅपमध्ये आणि मोबाईल डिव्हाइसवर दिसणारा गुगलचा होमस्क्रीन लोगो उपलब्ध आहे.

BSF Jawan : सहावेळा फ्लॅग मीटिंग अन् 84 वेळा वाजली शिट्टी; BSF जवानाच्या सुटकेची इनसाईड स्टोरी

मंगळवारी रात्री गुगलने ‘द अँड्रॉइड शो: आय/ओ एडिशन’मध्ये अँड्रॉइड 16 ची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि मजेदार डिझाइन घटकांचे अनावरण केले . 20-21 मे रोजी होणाऱ्या गुगल आय/ओ डेव्हलपर कॉन्फरन्सच्या आधी हा शो अँड्रॉइडवर लक्ष केंद्रित करणारा कार्यक्रम होता. गेल्या वर्षीच्या गुगल आय/ओ मध्ये एआय वर जास्त लक्ष केंद्रित केले होते, पण यावेळी या शोच्या माध्यमातून गुगलने अँड्रॉइडमध्ये होत असलेल्या बदलांवरही लक्ष केंद्रित केले आहे. या स्वतंत्र कार्यक्रमात, अँड्रॉइड 16, वेअर ओएस 6, डिझाइन, एआय इंटिग्रेशन, सुरक्षा आणि डिव्हाइस ट्रॅकिंग यासारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आलं असल्याची माहिती समोर आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube