मोठी बातमी! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरवर बंद होणार Google Pay, PhonePe, जाणून घ्या सर्वकाही

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरवर बंद होणार Google Pay, PhonePe, जाणून घ्या सर्वकाही

UPI Alert : देशात दर महिन्याला काहींना काही बदल होत असतात. कधी बँकेंच्या नियमात तर कधी रेल्वेच्या नियमात बदल होत असतात मात्र नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 एप्रिलपासून देशात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या बदलाचा परिणाम लाखो लोकांवर होणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मोठी घोषणा केली आहे.

एनपीसीआय दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 एप्रिलपासून गुगल पे (Google Pay) , फोनपे (PhonePe) आणि पेटीएम (Paytm) सारख्या अ‍ॅप्सद्वारे यूपीआय वापरणाऱ्यांवर नवीन नियम लागू होणार आहे. या नियमांनुसार जर तुमचे बॅंक खाते अक्टिव्ह नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेले असेल तर या नंबरावरुन तुम्हाला 1 एप्रिलपासून गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या अ‍ॅप्स वापरता येणार नाही. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता एनपीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती देताना एनपीसीआयने सांगितले की, अभ्यासात असे दिसून आले की, अक्टिव्ह नसलेला मोबाईल नंबर बँकिंग आणि यूपीआय सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करू शकतो. जर एखाद्या टेलिकॉम कंपनीने तुमचा अक्टिव्ह नसलेला नंबर दुसऱ्याला दिला असला तर त्या नंबरवरून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एनपीसीआयने 1 एप्रिलपासून गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या अ‍ॅप्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे.

यूपीआय व्यवहार व्यवस्थित करण्यासाठी तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाइल अक्टिव्ह नंबर असणे अत्यंत महत्वाचे आहे. यूपीआयमार्फत आर्थिक व्यवहार करताना मोबाईल नंबर व्यक्तीची ओळख म्हणून काम करतो. नंबरमुळेच दोन व्यक्तींमधील यूपीआय व्यवहार पूर्ण झाला की याची माहिती प्राप्त होते. त्यामुळे जर अक्टिव्ह नसलेला नंबर दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आला असेल, तर त्यामुळे पेमेंट फेल होऊ शकते किंवा एखाद्याची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.

जर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असा मोबाईल नंबर अक्टिव्ह नसेल किंवा काही काळापासून रिचार्ज केलेला नसेल तुम्ही याबाबत टेलिकॉम प्रोव्हायडर कंपनीशी संपर्क करुन याबाबत माहिती घेऊ शकतात आणि जर नंबर अक्टिव्ह नसेल पुन्हा नंबर अक्टिव्ह करुन तुम्ही घेऊ शकतात.

मोबाईल नंबर किती दिवसांत दुसऱ्याच्या नावावर बदलला जातो?

मोबाईल नंबर बंद झाल्यानंतर तो दुसऱ्या ग्राहकाला पुन्हा देण्याची वेळ मर्यादा टेलिकॉम कंपनीवर अवलंबून असते. मात्र कोणताही बंद मोबाईल नंबर 90 ​​दिवस (3 महिने) “कूलिंग पिरियड” मध्ये राहतो. या कालावधीत ते इतर कोणत्याही ग्राहकांना दिले जात नाही. तर काही प्रकरणांमध्ये हा कालावधी 6 महिन्यांपर्यंत (180 दिवस) असू शकतो. विशेषतः जेव्हा टेलिकॉम ऑपरेटरकडे पुरेसे नवीन नंबर उपलब्ध असतात.

वाहनचालकांच्या खिशाला कात्री! समृद्धी महामार्गावर टोलवाढ; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

जर एखाद्या व्यक्तीने त्याचा नंबर बंद केला असेल आणि तो परत मिळवायचा असेल तर त्याला या कूलिंग पीरियडमध्ये टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधावा लागेल. जर असे झाले नाही तर तो नंबर दुसऱ्या कोणाला तरी दिला जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube