‘गुगल पे’चा वापरकर्त्यांना मोठा दणका! ‘या’ पेमेंटवर सुविधा शुल्क भरावा लागणार

‘गुगल पे’चा वापरकर्त्यांना मोठा दणका! ‘या’ पेमेंटवर  सुविधा शुल्क भरावा लागणार

Google Pay Charging Convenience Fees For Bill Payment : तुम्ही सुद्धा दैनंदिन व्यवहारात गुगल पे (Google Pay) वापरता का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. घरबसल्या आपल्याला ऑनलाईन झटपट बिल भरता (Bill Payment) येतंय, त्यामुळे व्यवहार अगदी सोपे झालेत. सुरूवातीला हे पेमेंट अगदी मोफत व्हायचं, पण अलीकडे मात्र सुविधा शुल्क आकारण्यात येत आहेत, त्यामुळं ग्राहकांना मोठा भूर्दंड बसतोय. यूपीआयपासून (UPI) बिल पेमेंटपर्यंत विविध सेवा देणाऱ्या अ‍ॅप्समुळे आता ग्राहकांवर ओझे वाढू लागलंय.

चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या जनरल तिकीट नियमांत बदल; कोट्यावधी प्रवाशांना बसणार झटका

बिल पेमेंटसाठी प्रत्येकाने सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली (Online Payment) आहे. गुगल पे देखील या शर्यतीत मागे राहिलं नाही, कारण आता गुगलने वापरकर्त्यांकडून सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे आता ग्राहकांनी गुगल पेद्वारे पेमेंट केल्यास त्यांना सेवा शुल्क भरावं लागणार असल्याचं समोर येतंय.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, जर तुम्ही बिल पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर 0.5 टक्के ते 1 टक्के शुल्क आकारले जाईल, या शुल्काव्यतिरिक्त, तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागेल. आतापर्यंत गुगल पेने बिल पेमेंटसाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले नव्हते. सध्या, गुगल पेने सुविधा शुल्काबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

‘छावा’ पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ राज्यांत चित्रपट टॅक्स फ्री, CM मोहन यादव काय म्हणाले?

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात नमूद केलंय की, गेल्या एका वर्षापासून गुगल पे त्यांच्या वापरकर्त्यांकडून मोबाईल शुल्कावर 3 रुपये सुविधा शुल्क आकारत आहे. अहवालात असंही म्हटलंय की, जेव्हा एखाद्या ग्राहकाने वीज बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला तेव्हा अॅपने वापरकर्त्याकडून 15 रुपये सुविधा शुल्क आकारले. हे शुल्क अ‍ॅपमध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क या नावाने दाखवले जात आहे, यामध्ये जीएसटी देखील समाविष्ट आहे.

गुगल पे द्वारे UPI व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जागतिक सेवा फर्म PwC नुसार, भागधारकांना UPI व्यवहार प्रक्रियेत 0.25 टक्के खर्च करावा लागतो. आता असं दिसतंय की, हा खर्च भागवण्यासाठी फिनटेक कंपन्या नवीन महसूल मॉडेल्स स्वीकारत आहेत. UPI व्यवहार आतापर्यंत पूर्णपणे मोफत आहे, UPI वर शुल्क आकारण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे, परंतु आतापर्यंत सरकारने ते मोफत ठेवले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube