Google, Meta सह दिग्गज कंपन्याची कर्मचाऱ्यांवर वक्रदृष्टी; तीनच महिन्यांत हजारो बेरोजगार..

Google, Meta सह दिग्गज कंपन्याची कर्मचाऱ्यांवर वक्रदृष्टी; तीनच महिन्यांत हजारो बेरोजगार..

Tech Layoffs in 2025 : टेक इंडस्ट्रीत सध्या कर्मचारी (Tech Layoffs in 2025) कपातीची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या वर्षातही गुगल आणि मेटा यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी रिस्ट्रक्चरिंगचे कारण पुढे करत मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केली आहे. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI), कॉस्ट कटींग आणि ऑपरेशनल स्ट्रीमलायनिंग हे काही घटक कर्मचारी कपातीला कारणीभूत ठरले आहेत.

Layoff.fyi कडून मिळालेल्या माहितीनुसार 2025 या वर्षात आतापर्यंत 93 कंपन्यांतून 23 हजार 500 कर्मचाऱ्यांनी रोजगार गमावला आहे. 2022 आणि 2023 मधील कपातीच्या तुलनेत हा आकडा कमी दिसत असला तरी या ट्रेंडवरुन लक्षात येते की यंदाही कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार कायम राहणार आहे.

गुगलने आपल्या Platforms and Devices विभागातून शेकडो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. या कर्मचाऱ्यांची टीम अँड्रॉईड आणि पिक्सल स्मार्टफोन्स व्यतिरिक्त Chrome वर काम करत होती. कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की मागील वर्षात इंटर्नल टीम मर्जरनंतर कर्मचारी कपात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील कंपनीच्या क्लाउड आणि एचआर विभागातील कपातीनंतर ही कपात झाली आहे.

मायक्रोसॉफ्टचा विचार केला तर मे 2025 मध्ये कंपनी एक नव्या टप्प्यातील कर्मचारी कपातीची तयारी करत आहे. मिडल मॅनेजमेंट रिस्ट्रक्चर आणि काही विभागात इंजिनिअर टू मॅनेजर प्रमाण 10:1 वाढवण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात येत आहे. कामगिरीच्या आधारावर होणाऱ्या कपातीची संख्या वाढू शकते.

मोठी बातमी! आता पहिलीपासूनच इंग्रजीसह हिंदी भाषा अनिवार्य; नव्या शैक्षणिक धोरणात काय?

कर्मचारी कपात फक्त मोठ्या कंपन्यांतच होत आहे असे नाही तर WordPress नेही 270 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. Canva कंपनीने 10 ते 13 टेक्निकल रायटर्सना घरचा रस्ता दाखवला आहे. डबलिनमध्ये TikTok ने सुद्धा 300 कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. भारतात Ola Electric कंपनीने एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. Simens ने ऑटोमेशन आणि EV Charging युनिट्समधून जवळपास 5 हजार 600 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Salesforce आणि Blue Origin या कंपन्यांनीही बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. या कंपन्यांनी प्रत्येकी एक हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. जगातील आणखी एक दिग्गज कंपनी मेटानेही आपल्या एकूण मनुष्यबळात 5 टक्के (3600 कर्मचारी) कपात केली आहे. Amazon ने कम्युनिकेशन टीमला कात्री लावली आहे.

कंपन्यांत कर्मचारी कपात सुरुच आहे तर दुसरीकड अनेक कंपन्या एआय फोकस्डसाठी नवीन भरतीही करत आहेत. यावरून लक्षात येते की आता कंपन्यांच्या गरजांत बदल झाला आहे. उच्च महागाई, कमी तांत्रिक खर्च आणि एआय ड्रिवन ऑटोमेशन यांसारखी कारणे कर्मचारी कपातीस कारणीभूत ठरली आहेत. या सगळ्या घडामोडीत कर्मचाऱ्यांनी मात्र रोजगार गमावला आहे. आता या कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचं मोठं संकट उभं राहीलं आहे.

काय सांगता? इंस्टाग्राम-व्हॉट्सअप विकले जाणार…फसवणुकीच्या प्रकरणात मार्क झुकेरबर्ग अडकले?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube