Google डिलीट करणार तुमचा डेटा, क्रोम युजर्स सावधान!

  • Written By: Last Updated:
Google डिलीट करणार तुमचा डेटा, क्रोम युजर्स सावधान!

Google Chrome Incognito Mode : कोणत्याही प्रश्नाचे काही मिनिटांमध्ये उत्तर देणाऱ्या गुगलवर 2020 मध्ये एक खटला दाखल करण्यात आला होता. क्रोम युजर्सचा डेटा गुगल इनकॉग्निटो मोडमध्ये (Google Chrome Incognito Mode) गोळा करतो असा आरोप गुगलवर 2020 मध्ये करण्यात आला होता. 2024 जानेवारीमध्ये गुगलने हे मान्य करून खटला मिटवण्यासाठी चर्चेची तयारी दाखवली होती.

तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गुगल आता क्रोमच्या इनकॉग्निटो मोडमधून गोळा केलेला डेटा डिलीट करणार आहे. मात्र त्यापूर्वी कंपनी क्रोम मधील इनकॉग्निटो मोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये (description) बदल करून वापरकर्त्यांना याची माहिती देणार आहे.

क्रोम इनकॉग्निटो मोडमधील डेटा

कोणतीही हिस्ट्री सेव्ह न करता वेब ब्राउजिंग करण्यासाठी आज अनेकजण क्रोममधील इनकॉग्निटो मोडचा वापर करते. इनकॉग्निटो मोडमुळे वापरकर्त्यांची ब्राउजिंग हिस्ट्री (browsing history), कुकीज किंवा इतर कोणतीही माहिती फोन किंवा कंप्यूटरमध्ये सेव्ह होत नाही. यामुळे सध्या क्रोम इनकॉग्निटो मोडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि वेबसाइटला इनकॉग्निटो मोडमधील डेटा सहज दिसतो.

काँग्रेसमधून संजय निरुपम यांची हकालपट्टी; ‘या’ पक्षात करणार प्रवेश

यामुळेच 2020 मध्ये कंपनीवर तब्बल 5 बिलियन डॉलर्सचा खटला दाखल करून कंपनी इनकॉग्निटो मोडमध्ये युजर्सना ट्रॅक करते असा आरोप करण्यात आला होता. दाखल झालेल्या या खटल्यानंतर आता कंपनीने हे प्रकरण मिटवण्याची भूमिका घेतली आहे मात्र कंपनी हे का ? करत आहे याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

तर दुसरीकडे आता कंपनीने आपल्या इनकॉग्निटो मोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये बदल केला आहे. या नवीन डिस्क्रिप्शनमध्ये कंपनीने इनकॉग्निटो मोडमध्ये गुगल काही माहिती सेव्ह करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नवीन डिस्क्रिप्शन डेस्कटॉप क्रोमच्या काही व्हर्जनमध्ये दिसत आहे.

शिंदेंच्या 4 खासदारांना धक्का! नाराजी अन् बंडखोरीच्या भीतीने उमेदवारीच गेली; आता नंबर कुणाचा

डेटा डिलीट करणार

माहितीनुसार, आता गुगल इनकॉग्निटो मोड मध्ये सेव्ह केलेला डेटा डिलीट करण्याची तयारी करत आहे. मात्र कंपनी कधीपर्यंत डेटा डिलीट करणार याची देखील माहिती कंपनीने दिलेली नाही. याच बरोबर कंपनी येणाऱ्या दिवसात वापरकर्त्यांचा डेटा सेव्ह करणे बंद करणार की नाही हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज