भारतीय वंशाच्या लोकांना होणार फायदा; गृहमंत्री अमित शाहने लाँच केले नवीन OCI पोर्टल

भारतीय वंशाच्या लोकांना होणार फायदा; गृहमंत्री अमित शाहने लाँच केले नवीन OCI पोर्टल

OCI Portal : गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी पीआयओची नोंदणी आणखी सुलभ करण्यासाठी अपडेटेड ‘यूजर इंटरफेस’सह नवीन ‘ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया’ पोर्टल लाँच केले आहे. सरकारने 2005 मध्ये ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI ) योजना सुरू केली होती. या योजनेत 26  जानेवारी 1950 नंतर भारताचे नागरिक असलेल्या किंवा 26 जानेवारी 1950 रोजी नागरिकत्व मिळविण्यास पात्र असलेल्या किंवा त्यांचे वंशज असलेल्या सर्व भारतीय वंशाच्या व्यक्तींची (पीआयओ) ओसीआय म्हणून नोंदणी करण्याची तरतूद करण्यात आली.

याबाबात माहिती देताना आज, पीआयओची नोंदणी सुलभ करण्यासाठी अपडेटेड यूजर इंटरफेससह सुधारित ओसीआय पोर्टल लाँच केले आहे. अशी माहिती अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर दिली.

भारतीय वंशाच्या नोंदणीची सोय या योजनेत भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारताचे परदेशी नागरिक म्हणून नोंदणी करण्याची तरतूद आहे. जर ते 26 जानेवारी 1950  रोजी किंवा त्यानंतर भारताचे नागरिक असतील किंवा त्या तारखेला नागरिक होण्यास पात्र असतील. तथापि, ज्या व्यक्ती स्वतः, त्यांचे पालक, आजी-आजोबा आणि पणजोबा पाकिस्तान किंवा बांगलादेशचे नागरिक आहेत किंवा राहिले आहेत ते पात्र नाहीत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुधारित प्लॅटफॉर्म विद्यमान कमतरता दूर करतो आणि परदेशात राहणाऱ्या पीआयओंसाठी अधिक वापरकर्ता-अनुकूल, कार्यक्षम आणि अखंड इंटरफेस प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ओसीआय कार्ड भारतीय वंशाच्या लोकांना दिले जाते ज्यांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे, ज्यामुळे त्यांना भारतात आजीवन व्हिसा-मुक्त प्रवास आणि काही आर्थिक आणि शैक्षणिक अधिकार मिळतात.

लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय द्विपक्षीय पातळीवरच; परराष्ट्र सचिवांनी ट्रम्पचा दावा फेटाळला 

गेल्या काही वर्षांत, जागतिक स्तरावर ओसीआय धारकांच्या वाढत्या संख्येसह, चांगल्या डिजिटल सेवा आणि अधिक प्रतिसादात्मक प्रणालींची मागणी वाढली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube