जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केलं, मंत्रिपदाची शपथ घेताच भुजबळांचा हल्लाबोल

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या जागी अजित पवार (Ajit Pawar) मंत्रिमंडळात कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार जातीवादी लोक पोसायचे काम करत आहे. तसेच छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही अशी टीका जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे. तर आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाला त्रास होत आहे. असं छगन भुजबळ म्हणाले.
माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, ह्या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका अन् खेळ्या केल्या आहेत. मनोज जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केलं आहे, त्याच्यामुळे गावागावत वाद लागले आहेत. असं माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले. तसेच मराठा समाज हा सगळ्याच मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो, पण ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजाला त्रास झालाय. असेही यावेळी छगन भुजबळ म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे?
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.
झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव 2025’ मध्ये दोन मोठ्या घोषणा; जाणून घ्या सर्वकाही