झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव 2025’ मध्ये दोन मोठ्या घोषणा; जाणून घ्या सर्वकाही

झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव 2025’ मध्ये दोन मोठ्या घोषणा; जाणून घ्या सर्वकाही

Amba Mahotsav 2025 : अनेक वर्षं झी मराठीने आपली ओळख आपल्या कथा, मालिकांमधून जपली आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली ही वाहिनी, ह्यावर्षीपासून एक नवा उपक्रम घेऊन आली आहे तो म्हणजे ‘आंबा महोत्सव 2025’. (Amba Mahotsav 2025) हा पहिल्या ‘सीझनल’ सोहळ्याचं निवेदन प्रणव रावराणे, तितिक्षा तावडे आणि अधोक्षज कह्राडे या त्रिकुटाने केले. त्यांची केमिस्ट्री आणि उत्साही निवेदनाने संपूर्ण वातावरणात चैतन्य भरले होते.

कार्यक्रमाची सुरुवात झी मराठीच्या (Zee Marathi) चीफ चॅनल ऑफिसर व्ही. आर. हेमा (V. R. Hema) यांच्या भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करताना “झी मराठी ही फक्त एक वाहिनी नाही, ती मराठी मनांची साथ आहे असं सांगत, आमचं प्रत्येक पाऊल प्रेक्षकांच्या विश्वासाला समर्पित आहे. आंबा महोत्सव म्हणजे आमच्या आणि प्रेक्षकांच्या मधुर नात्याचा उत्सव. त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. झी मराठी ‘कमळी’ ही नव्या दमाची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तर दुसरी आणि सर्वात महत्वाची बातमी म्हणजे झी नेटवर्कवरील पहिली मराठी वेब सिरीज ‘अंधार माया’ झी5 घेऊन येत आहे ज्याचा फर्स्ट लुक या “आंबा महोत्सवात” पाहुण्यांना दाखवण्यात आला. ही वेब सिरीज शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी ‘सार्थ मोशन पिक्चर्स’ या बॅनरखाली निर्मित झाली आहे. शर्मिष्ठा राऊत यांनी झी मराठी आणि आपल्या नव्या प्रजेक्ट बद्दल बोलताना सांगितले, “एक ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून शर्मिष्ठ मधल्या कलाकाराचा प्रवास सुरु झाला होता आणि ती संधी ही झी मराठीवरच मिळाली होती. त्यानंतर एक निर्माती म्हणून माझ्या पहिल्या प्रोजेक्टला ही झी मराठीनेच साथ दिली आणि आता जेव्हा OTT वर ही झी मराठी मला एक निर्माती म्हणून काम करण्याची संधी देत आहे आणि माझ्यावर इतका विश्वास टाकत आहे.

माझ्यासाठी हे एक स्वप्न साकार झाल्यासारखं आहे.” या मोठ्या घोषणेनंतर सुरू झाली आंबा महोत्सवाची धमाल आणि कलाकारांची मस्ती. झी मराठी मालिकांमधील कलाकारांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतला. आंब्याच्या थीमवर आधारित मजेशीर खेळ, हास्यविनोद आणि कलाकारांमधली आपुलकी सगळ्यांनी अनुभवली.

अक्षय कुमारने परेश रावलला धाडली 25 कोटींची नोटीस; ‘या’ कारणाने संतापला ‘राजू’

या आनंदोत्सवात कलाकारांनी आपल्या भावना करत “झी मराठी म्हणजे आमचं दुसरं घर आहे. या घरातल्या सर्व सदस्यांसोबत असा मजेशीर सोहळा साजरा करणं म्हणजे एक वेगळीच मज्जा येते. आंबा महोत्सवाच्या या हंगामी सणात, जो दरवर्षी हवा हवासा वाटतो असा उत्सव आम्हाला अनुभवायला मिळाला.” कार्यक्रमाचा शेवट आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या चवीने झाला. कलाकार पत्रकार एकत्र येऊन साजरा केलेला हा पहिलाच ‘आंबा महोत्सव’ प्रत्येकाच्या मनात कायमचा घर करून गेला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube