अक्षय कुमारने परेश रावलला धाडली 25 कोटींची नोटीस; ‘या’ कारणाने संतापला ‘राजू’

अक्षय कुमारने परेश रावलला धाडली 25 कोटींची नोटीस; ‘या’ कारणाने संतापला ‘राजू’

Hera Pheri 3 Controversy : हेराफेरी आणि फिर हेराफेरी नंतर लाखो प्रेक्षकांना चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. परंतु आता ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावरून प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यावेळी सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल तिघे चित्रपटात असतील असे सांगण्यात आले होते. पण, परेश रावल यांनीच सांगितले की मी या चित्रपटात नाही. यानंतर अक्षय कुमारने सरळ परेश रावल यांनी कायदेशीर नोटीस धाडली आहे. अक्षयने तब्बल 25 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे.

अक्षय कुमारचे प्रोडक्शन हाउस केप ऑफ गुड फिल्म्समार्फत ही नोटीस बजावण्यात आली आहे. रिपोर्टनुसार प्रोडक्शन हाउसने परेश रावल यांच्यावर अनप्रोफेशनल वर्तणुकीचा आरोप केला आहे. परेश रावल यांनी हेराफेरी 3 साठी लीगल काँट्रॅक्ट केले होते. चित्रपटाचे शुटींगही सुरू झाले होते. परंतु, रावल यांनी अचानक चित्रपट सोडून दिला. त्यांच्या या निर्णयाने चित्रपटाचे मोठे नुकसान झाले. यानंतर निर्मात्यांनी नोटीस पाठवून परेश रावल यांच्याकडे 25 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

 बडे मियाँ छोटे मियाँ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा

हेराफेरी 3 हा चित्रपट अक्षय कुमार स्वखर्चाने तयार करत आहे. यासाठी अक्षयच्या प्रोडक्शन हाउसने कोणतेही कर्ज देखील घेतलेले नाही. परंतु, परेश रावल यांनी माघार घेतल्याने अक्षय कुमारचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते असे सांगितले जात आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शननेही यास दुजोरा दिला आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासाठी भरपूर पैसे खर्च केले ही खरी गोष्ट आहे. आम्ही एक दिवसाचे चित्रीकरणही केले होते. परेश रावल यांनी तर माझ्याशी साधी चर्चा देखील केली नाही. आपण हा निर्णय का घेतोय याचं कारणही त्यांनी सांगितलं नाही असे प्रियदर्शन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

आता परेश रावल यांच्या जागी कोण असेल याबाबत मला आता तरी काही माहिती नाही. कारण परेश माझ्याशी काहीच बोलत नाहीत. याबाबतीत ज्यावेळी मला कुणीतरी सांगेल त्याचवेळी मला समजेल. त्यांनी सांगितलं होतं की त्यांना माझ्यापासून काही त्रास नाही पण चित्रपट का सोडला याचं कारण रावल यांनी सांगितलंच नाही असेही प्रियदर्शन यांनी सांगितले.

संधी मिळाल्यास…मराठी नाटक आवर्जून बघा, अभिनेते परेश रावल यांनी सांगितला खास अनुभव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube