20 किलोची पालखी आणि तो पेहराव…’; अभिनेत्याने सांगितला थक्क करणारा शूटींगचा किस्सा

20 किलोची पालखी आणि तो पेहराव…’; अभिनेत्याने सांगितला थक्क करणारा शूटींगचा किस्सा

Lakhat Ek Amcha Dada Shooting: झी मराठीवर (Zee Marathi) नव्यानेच दाखल झालेल्या ‘लाखात एक आमचा दादा’ या (Lakhat Ek Amcha Dada) सिरियलचा पहिला भाग नुकताच (Marathi serial) प्रसारित झाला आणि हा भाग पाहताच (Nitish Chavan) प्रेक्षकांनी सिरीयलवर मोठ्या प्रमाणात प्रेमाचा वर्षाव केला आणि सोशल मीडियावर (social media) मोठा प्रतिसाद यायला सुरुवात झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


तो प्रतिसाद होता चार प्रेमळ बहिणींना, सूर्यादादाला आणि जेष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक जे या मालिकेत डॅडीची भूमिका साकारत आहेत. तसेच हा प्रतिसाद होता प्रत्येक दमदार व्यक्तिरेखेसाठी. जो क्षण आणि जो सीन प्रेक्षकांच्या हृदयात आणि मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात नेहमीसाठी कोरला गेला तो म्हणजे सूर्यादादाचा यात्रेमधला यात्रेचा सीन. नितीश चव्हाणसाठी एक अभिनेता म्हणून तो सीन साकारण्याचा अनुभव कसा होता हे व्यक्त करताना नितीशने सांगितले, ” जेव्हा मला कळलं की यात्रेमधला असा एक सीन करायचा आहे तेव्हा पासून मनात धाकधूक चालू होती. कसा होईल, काय करता येईल हे विचार सतत डोक्यात चालू होते. जेव्हा तो दिवस आला तेव्हा पर्यंत मी काहीही ठरवलं नव्हतं. कारण अंगात येणं हे मी आजपर्यंत कधी अनुभवलं नव्हतं म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं ह्याची कल्पना नव्हती. जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि तयार होऊन जेव्हा स्वतःला पहिल्यांदा आरश्यात पाहिलं ते पाहून माझा आत्मविश्वास वाढला.

इतका कमाल लुक अस्तित्वात आणला होता. तो लुक पाहून ती भावना जागरूक झाली की मी काहीतरी वेगळं करायला चाललो आहे, यासाठी मला मेकअप दादांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. सीनसाठी मी तयार झालो आणि सर्वात आधी देवी समोर गेलो तिचा आशीर्वाद घेतला आणि तिला प्रार्थना केली की मला माहिती नाही कसं करायचं, काय करायचं, तू माझ्या कडून हे सर्व नीट करून घे. मी पहिला टेक केला आणि तो संपल्यानंतर सर्वानी टाळ्यांचा गजर केला. सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की वाटलंच नाही तू नितीश आहेस आणि तू अभिनय करतोयस, असं वाटत होत की खरंच तुझ्या अंगात आलाय. श्वेता मॅडमने येऊन मिठी मारली, किरण सर आमचे दिग्दर्शक आले आणि म्हणाले बस तू फक्त एपिसोड बघ आता. सीन पूर्ण झाल्यावर परत एकदा देवीच्या चरणी गेलो आणि तिचे आभार मानले की माझ्याकडून हे तूच करवून घेतलं आहेस.

Jau Bai Gavat: बोलताना विचार करुन बोल जा…; राणादाने अभिनेत्रीला खडसावलं

आमचं त्या दिवशीच शूटिंग संपल्यावर ही परत मी परत देवीला भेटायला गेलो, आणि ती माझ्या पाठीशी उभी राहिली ह्याचे आभार मानले, कारण हे फक्त तिच्यामुळेच मी करू शकलो. देवीच्या पालखीबद्दल बोलायचं झालं तर 20 किलोची पालखी होती आणि आर्ट दादांनी तर कमालच केली होती. 20 किलोची पालखी आणि तो पेहराव त्यासोबत डायलॉग्स बोलायचे हे सगळं करण्यात दमछाक होतं होती, एकदा, दोनदा मला चक्कर ही आली पण तरी ही मी थांबलो नाही कारण ती एक ऊर्जा आणि शक्ती अंगात होती. ही सगळी ऊर्जा देवींनीच दिली असं मी मानतो आणि ती पाठीशी होती म्हणून यशस्वीपणे मी हा सीन निभावू शकलो ज्याचा इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘लाखात एक आमचा दादा’ दररोज रात्री 8.30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube