Jau Bai Gavat: ‘बोलताना विचार करुन बोल जा’; राणादाने अभिनेत्रीला खडसावलं

Jau Bai Gavat: ‘बोलताना विचार करुन बोल जा’; राणादाने अभिनेत्रीला खडसावलं

Jau Bai Gavat Latest Update: छोट्या पडद्यावर ‘जाऊ बाई गावात’ (Jau Bai Gavat) नावाचा एक नवा शो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये सध्या अनेक हटके खेळ होत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतचं सुरू झालेल्या या शोमध्ये सर्वात पहिले गावात जाण्याचा मान मिळवणाऱ्या मुक्ताला (Mukta) राणादा’ने म्हणजेच हार्दिक जोशीने (Hardik Joshi) खडसावलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


स्वप्नातलं शहर म्हणून मुंबई (Mumbai) अनेकांची पसंती असते. मुंबईसारख्या झगमगाटी शहरातलं आरामाच जगणं सोडून आलेल्या या मुली गावच्या वातावरणात कसे टिकून राहणार, हे या खेळामधून बघायला मिळणार आहे. शहरांतून गावात आलेल्या मुली आता लाल मातीच्या घरात कशा राहणार, हे पाहायला मिळत आहे.

‘जाऊ बाई गावात’ची स्पर्धक मुक्ताने गावामधील एका आजीवर आवाज चढवला होता. मात्र, तिला तिची चुक सांगत असताना कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक हार्दिक जोशी (Hardik Joshi) म्हणजेच चाहत्यांचा लाडका राणादाशीही ती उद्धटपणे वागली आहे. ही तर सुरुवात आहे. कारण, येणारा प्रत्येक नवीन दिवस या स्पर्धकांसाठी कसोटीचा सामना राहणार आहे.

Animal मधील फायटर मशीनगन महाराष्ट्रात बनली; 18 मिनिटांच्या सीन्ससाठी मोजले एक कोटी

या खेळामध्ये पुढे आता गावातील कोंबड्या आता सर्व स्पर्धकांची वाट बघत आहेत. हा खास टास्क घेऊन क्रांती रेडकर स्पर्धकांच्या भेटीला येणार असल्याचे दिसत आहे. क्रांती रेडकर हिचं कोंबड्याशी एक अनोखं नातं आहे. आता ती या खेळामध्ये एक नवा ट्विस्ट घेऊन येणार आहे. आता हे स्पर्धक या कार्यामध्ये यश मिळवू शकणार? मुक्ताच्या उद्धटपणाचा दुसऱ्या इतर स्पर्धकांना त्रास भोगावा लागणार का? की, मुक्ता खेळाचं मैदान सोडून जाणार का?, हे खेळाच्या आगामी भागामध्ये बघायला मिळणार आहे. खेळाच्या आगामी भागांमध्ये चाहत्यांची उत्कंठा वाढणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube