Animal मधील फायटर मशीनगन महाराष्ट्रात बनली; 18 मिनिटांच्या सीन्ससाठी मोजले एक कोटी

Animal मधील फायटर मशीनगन महाराष्ट्रात बनली; 18 मिनिटांच्या सीन्ससाठी मोजले एक कोटी

Animal : अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल(Animal) चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील एका सीन्समध्ये गुंड जेव्हा रणविजय बलवीर सिंगच्या घरी मारण्यासाठी घुसतात तेव्हा एक ब्लास्ट गोळीचं दृश्य दिसतं. या दृश्यात दिसत असलेली फायटर मशीनच्या सीन्सवर प्रेक्षकांनी चांगलाच टाळ्यांचा कडकडाट केल्याचं पाहायला मिळालं. ही फायटर मशीनगन महाराष्ट्रात जोडण्यात आली होती. या फायटर मशीनसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च आला. 18 मिनिटाच्या या सीन्ससाठी या मशीनची निर्मीती भारतातच करण्यात आली होती.

भाजपच्या 12 खासदारांसाठी ‘हिवाळी अधिवेशन’ शेवटचे : साडेचार वर्षांतच संसदेतून मिळाला नारळ

या फायटर मशीनगनची कल्पना दिल्लीत मांडण्यात आली. तिथेच ही मशीनगन बनवण्याचा प्लॅन आखण्यात आला. कलादिग्दर्शक सुरेश सेल्वराजन यांच्या टीमने ही मशीन तयार केली असून भारतातच तयार करण्यात आलेली,.आत्मनिर्भर भारत अंतर्गत ही मशीनगन पूर्णपणे भारतीय निर्मितीची आहे. या मशीनगनला बंगळुरुमध्ये बनवण्यात आलं असून या मशीनगनची जोडणी महाराष्ट्रात करण्यात आली आहे. मशीनगनचा वापर चित्रपटातल्या भयानक सीन्ससाठी करण्यात आलायं. ही मशीनगन चालवण्यासाठी खुद्द रणबीर कपूरलाही प्रशिक्षण घ्यावं, लागलं आहे.

बीआरएसला महाराष्ट्रात पहिला धक्का, भगिरथ भालके वेगळ्या वाटेवर?

ही मशीनगन पूर्णपणे ओरिज्नल असून तिला बनवण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला. ही मशीनगन 500 किलो वजनाची असून पूर्णपणे मानवनिर्मित आहे. सुरेश सेल्वराज यांच्यासह 100 पेक्षा अधिक लोकांनी या मशीनगनसाठी मेहनत घेतली आहे. चित्रपटात या मशीनगनचा सीन्स अवघा 18 मिनिटेच दाखवण्यात आला आहे.

कोरोनाकाळात करोडोंना साक्षर करणारे बायजू रवींद्रन झाले बेघर; कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवली संपत्ती

ही मशीनगन स्टीलपासून बनवली असून ही तीन चाकी बाइक आहे. त्यामध्ये वेगवेगळे भाग बसवण्यात आले असून विंड शील्ड देखील बसवण्यात आले आहे. ज्याचा चित्रपटात बुलेट सुरक्षा कवच म्हणून वापर करण्यात आला आहे. तसेच लहान आणि मोठे असे एकूण 3 फिरणारे बॅरल्सदेखील आहेत.

मध्य प्रदेशात हायकमांड अ‍ॅक्शन मोडवर, कमलनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी

चित्रपटात या मशीनगनमधून गोळ्या निघताना दिसत आहेत. प्रत्यक्षात ते अंधेरी, मुंबई येथे बनवण्यात आले आहे. या मशीनचे सर्व भाग व्यवस्थित काम करत असून प्रत्यक्षात मात्र त्यातून गोळ्या निघत नाहीत. याशिवाय इतर बाईकप्रमाणे तीही चालवता येते. ही बाईक बनवण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube