“सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह

“सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह

Zee Marathi Launch Campaign Of Sadaiva Tumchi Zee Marathi : गेली 26 वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवणारी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ‘मी मराठी झी मराठी’ (Zee Marathi) असं अभिमानाने म्हणत महाराष्ट्र आणि देशविदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपला एक वेगळा ठसा उमटवला. आता हीच आपली झी मराठी नवीन ओळख आणि एक नवा अध्याय सुरू करत आहे. ‘सदैव तुमची झी मराठी’, या ओळींमागे आहे एक साधा पण खोलवर जाणा-या भावनेचा विचार. “सदैव तुमची” ही भावना (Entertainment News) आहे. आपलेपणाची, एकत्रतेची आणि छोट्या-छोट्या क्षणांमधून निर्माण होणाऱ्या मोठ्या भावनिक बंधांची. झी मराठी आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती, भावना, आणि दैनंदिन जीवनातल्या सत्य घटनांना सिनेमॅटिक रूप देते.

मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना! 12 जण रेल्वे ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू

या मोहिमेबद्दल झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर , कार्तिक महादेव, बोलताना म्हणाले ‘आपका अपना झी’ , “है एक ताकदवान कॅम्पेन आहे ज्यात बहुभाषिक ब्रँड फिल्म सिरीज बनवल्या गेल्या आहेत. आपल्या देशातील विविध भागांचे दर्शन घडवते. ही मोहीम दाखवते की भारतातले लोक एकमेकांसाठी कसे उभे राहतात. सातही फिल्म्स त्यांच्या-त्यांच्या भागाच्या संस्कृतीशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्या भागांची चाल, रूढी, निसर्गदृश्यं आणि लोकांची खरी ओळख उलगडतात. केरळमध्ये पावसालाही एक पात्र म्हणून दाखवलं आहे, तर आंध्र प्रदेशमधील एका गावाचा सैन्य सेवेचा वारसा उलगडला आहे. प्रत्येक गोष्ट भारताच्या सांस्कृतिक विविधता आणि भावनिक सत्य दाखवते. ही मोहीम झी आपल्या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यात एक विश्वासू सोबती म्हणून कसा आहे, हे पुन्हा सांगते. ‘साथ हैं तो बात हैं’ ही भावना देशातील लाखो घरांच्या मनाशी जोडलेली आहे. जिथे झी फक्त पाहिलं जात नाही, तर दररोज त्याच स्वागत केलं जातं.”

लायकीपेक्षा जास्त बोललात, परत बोललात तर…’त्या’ वक्तव्यावरून राणेंचा महाजनांना

या संदर्भात झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर व्ही. आर. हेमा म्हणाल्या, “सदैव तुमची झी मराठी हे वाक्यच आपल्या नात्यांमधील भावनिक गुंतवणूक दाखवते. इथं एकमेकांच्या सुखदुःखात खांदा देऊन उभं राहणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर घराघरातली आपुलकीची एक भावना आहे. आता प्रेक्षकांसोबतचे नातं आणखी दृढ करण्यासाठी ‘झी मराठी’ एका नवीन रूपात नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे . या प्रवासात नव्याने सुरु झालेली ‘देवमाणूस’ आणि लवकरच सुरु होणारी ‘कमळी’ ह्या मालिका प्रेक्षकांना नक्कीच भावतील. पुन्हा नव्याने सुरु होणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. हे आणि असे अनेक नवनवीन सरप्राइझेस येत्या वर्षात झी मराठी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे.” झी मराठी ही लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनली आहे. इथे झी मराठी पाहिली जातेच, पण ती अनुभवलीही जाते. या नव्या प्रवासात आपली साथ हेच आमचं बळ आहे. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पुन्हा नव्याने सुरु होणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. हे आणि असे अनेक नवनवीन सरप्राइझेस येत्या वर्षात झी मराठी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे.” झी मराठी ही लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनली आहे. इथे झी मराठी पाहिली जातेच, पण ती अनुभवलीही जाते. या नव्या प्रवासात आपली साथ हेच आमचं बळ आहे. ”

मोठी बातमी! पंढरपुरात वशिवल्याचे दर्शन बंद, श्री विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

या माध्यमातून झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसोबतचं नातं आणखी घट्ट केलं आहे आणि एक असा सांस्कृतिक क्षण निर्माण केला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल.तेव्हा घेऊन आलॊ आहोत नवीन ओळख आणि त्याच भावनांसह, “सदैव तुमची मी मराठी झी मराठी”.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube