लायकीपेक्षा जास्त बोललात, परत बोललात तर…’त्या’ वक्तव्यावरून राणेंचा महाजनांना

लायकीपेक्षा जास्त बोललात, परत बोललात तर…’त्या’ वक्तव्यावरून राणेंचा महाजनांना

Narayan Rane on Prakash Mahajan : काही दिवसांपूर्वी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाजप मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी टीका केली असताना त्यांनी राणे यांची वैचारीक उंची काय असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी (Mahajan) तुलना करताना राणे यांची वैचारीक उंची ही लवंगी एव्हडी आहे असं विधान केलं होत. त्यावरून आता राजकारण तापलं असून भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाजन यांचा समाचार घेतला आहे.

ट्विट का डिलिट केलं? निलेश राणे यांनी दिलं एका वाक्यात उत्तर

नारायण राणे काय म्हणाले?

टीव्ही – 9 च्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. श्रीयुत राज आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत.

प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? कुठल्या एखादया पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये एवढी तुमची कुवत नाही. श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुध्दीमता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. श्रीयुत निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात ?

आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube