महात्मा गांधी अतिरेकी होते का? पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘सनातनी आतंकवाद’वर प्रकाश महाजन संतापले

Prakash Mahajan Criticize Prithviraj Chavan Statement : मालेगाव बॉम्बस्फोटानंतर भगवा आतंकवाद अन् सनातन आतंकवाद हे शब्द चर्चेत आलेत. मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan) हा शब्द सोईस्कररित्या समोर आणला आहे. ते स्वत:ला काँग्रेसच्या थिंक टँकमधले समजत होते. पण, त्यांनी सनातनी (Sanatani terrorism) हा शब्द वापरून ते थिंक टॅंकमधले नसून सेफ्टिक टॅंकमधले असल्याचं सिद्ध केलंय.
‘प्रतिचौरस फूट’ रेट! वसई-विरार बांधकाम घोटाळ्याचा ईडीने केला पर्दाफाश, 10 रुपयांत कमिशनचा खेळ
सनातन ही परंपरा केवळ भारतात
सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद हा शब्द वापरला. कॉंग्रेसची हिंमत आहे का हिरवा आतंकवाद म्हणायची? भगवा आतंकवाद हे वक्तव्य अंगलट येईल म्हटल्यानंतर त्यांनी सनातन आतंकवाद हा शब्द विचारला. पृथ्वीराज चव्हाण तुम्ही सुशिक्षीत आहात. सनातन ही परंपरा केवळ भारतात आहे, हे तुम्हाला माहित नाही का? असा सवाल प्रकाश महाजन यांनी केलाय. सनातन धर्माला मानणारे केवळ हिंदू आहेत. तुम्हाला काय म्हणायचं हिंदू अतिरेकी आहेत? असा सवाल त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना केलाय.
पुणे एमआयडीसीत अजितदादांची दादागिरी? CM फडणवीसांच्या विधानावर रोहित पवारांचा सवाल, राजकीय भडका…
कॉंग्रेसला केवळ हिंदूंना बदनाम करायचं
दर्ग्यावर अतिरेकी हल्ला झाला, तो हल्ला कोणी केला? ते सनातकी होते? पाकिस्तानमध्ये मस्जिदवर हल्ले झाले ते सनातनी होते का? सनातनी केवळ हिंदू आहे. कॉंग्रेसला केवळ हिंदूंना बदनाम करायचं आहे. कारण त्यांना मतांचं राजकारण करायचं आहे. अल्पसंख्यांक मतं मिळवायची आहे. म्हणून ते अशी भूमिका घेतात, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय.
हिंदू अतिरेकी आहेत?
सनातनी आतंकवाद म्हणजे काय म्हणजे हिंदू आतंकवादी आहे. कॉंग्रेसच्या या भूमिकेमुळे हिंदू कॉंग्रेसच्या विरोधात गेले आहेत. महात्मा गांधी स्वत:ला सनातनी हिंदू समजत होते. मग ते अतिरेकी होते का? असा सवाल प्रकाश महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना केलाय. गांधीजींची पुस्तकं वाचा अन् मग चर्चा करा. पृथ्वीराज चव्हाण यांना आज गांधीजी जवळचे नाही, तर राहुल गांधी जवळचे आहेत. आम्ही कोर्टाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. निकालाचा आदर केला पाहिजे, हिंदू निर्दोष सुटला मग तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला, असं देखील महाजन यांनी म्हटलंय.