मुलीच्या औषधासाठीही पैसे नव्हते; कर्जबाजारी व्यावसायिकाने संपवलं जीवन, फेसबुकवर लाईव्ह करत…

Debt-ridden Businessman End Life in Uttar Pradesh : मुलीच्या औषधासाठीही पैसे नव्हते , तर कर्जबाजारी व्यावसायिकाने थेट फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ केला. त्यानंतर टोकाचं पाऊल (Debt-ridden Businessman End Life) उचललं. जीवन संपवण्याआधी मोदी-योगींना हाक दिली, पण उत्तर येण्याआधीच स्वतःवर गोळी झाडली. फेसबुक लाईव्हवर शेवटची हाक, आणि बंदुकीचा आवाज, या घटनेत (Uttar Pradesh) बँकिंग, सरकार आणि समाज सगळं अपयशी ठरलं. आपण घटनेसंदर्भात सविस्तर (Crime News) जाणून घेऊ या.
अडीच वर्षांपासून मानसिक तणावात
उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी, त्याने फेसबुक लाईव्हवर स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे भयावह चित्र मांडले. आपल्या कुटुंबासाठी मदतीची कळकळीची (Money For Daughter’s Medicine) विनंती केली. ही घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिकावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. तो गेल्या अडीच वर्षांपासून मानसिक तणावात होता.
Madhavi Nimkar : माधवी निमकरचे बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो पाहाच…
फेसबुक लाईव्हमध्ये मदतीची याचना
लाईव्हदरम्यान त्याने सांगितले की, त्याच्याकडे मुलीसाठी इन्सुलिन इंजेक्शन घेण्याइतकेही पैसे शिल्लक नव्हते. त्याच्या आवाजात हतबलता स्पष्ट जाणवत होती. फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बड्या उद्योगपती आणि सेलिब्रिटींना आपल्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन करताना तो दिसला. मात्र, मदतीची ही साद ऐकूनही प्रत्यक्ष मदत पोहोचण्याआधीच त्याने टोकाचं पाऊल उचललं.
भाजपाचं ठरलं! पुण्यात अजितदादांना शह? शिलेदारांना खास मिशन अन् इनकमिंगही..
बंदुकीचा आवाज
आपल्या ऑफिसमध्ये गार्डच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्याने लाईव्ह संपवल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत त्याने स्वतःला गोळी घालून आयुष्य संपवले होते. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एडीसीपी पंकज सिंह म्हणाले, तो आर्थिक विवंचनेत होता. गेल्या काही वर्षांपासून त्याच्यावर कर्जाचं मोठं ओझं होतं. त्यामुळे नैराश्य येऊन त्याने आत्महत्या केली.