फडणवीसांच्या बंगल्यावर नाराजांचा ‘जनसागर’; उमेदवारी रद्द करण्यासाठी ‘आई’ ची धावाधाव

  • Written By: Published:
फडणवीसांच्या बंगल्यावर नाराजांचा ‘जनसागर’; उमेदवारी रद्द करण्यासाठी ‘आई’ ची धावाधाव

मुंबई : भाजपकडून काल (दि.20) विधानसभेसाठी पहिली 99 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत अनेकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे जाहीर करण्यात आलेल्या यादीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सागर बंगल्यावर आज (दि.21) नाराजांचा जनसागर उसळला आहे. पत्ता कट झालेले आणि अद्याप प्रतिक्षा यादीत असलेले इच्छुक उमेदवारांनी फडणवीसांची भेट घेत आमचं काय चुकलं? सांगा असा सूर आळवला आहे. तर, उमेदवारी घोषित झाल्यानंतर ती रद्द करून लेकाला द्यावी यासाठी आईने मुंबईकडे धाव घेतली आहे.

जागा वाटपात पटोले-ठाकरे आमने सामने; विदर्भातील ‘हा’ मतदारसंघ ठरला वादाचं मुख्य कारण

फडणवीसांना आतापर्यंत कोण-कोण भेटलं?

विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नावं जाहीर झालेल्या उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली आहे. तर, दुसरीकडे पहिल्या यादीतून नाव न आल्याने आणि काहींचा पत्ता खट झाल्याने मुरजी पटेल, भारती लव्हेकर, भीमराव तापकीर, बबनराव पाचपुते यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. तर आमदार सत्यजित तांबे ‘मेघदूत’ बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते.

महायुतीची मध्यरात्री खलबतं! राज ठाकरेंचा लोकसभेतील पाठिंबा ‘बिनशर्त’ परत करणार

लेकासाठी आईचा जीव तळमळला; उमेदवारी मिळूनही थेट मुंबईकडे धाव

जाहीर करण्यात आलेल्या 99 जणांना उमेदवारीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, घरात उमेदवारी मिळूनसुद्धा प्रतिभा पाचपुते (Pratibha Pachpute) यांनी मुंबईकडे धाव घेत फडणवीसांची भेट घेतली आहे. स्वतः ऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं आता त्यांच्या या मागणीवर पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ठाकरे गटाला भगदाड! शिरूरमध्ये अशोक पवारांविरोधात अजितदादांना सापडला तगडा उमेदवार

सुवर्णा पाचपुते यांच्याकडून बंडाचा इशारा

श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या जुन्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यादेखील इच्छूक होत्या. त्यामुळे प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सुवर्णा पाचपुते यांच्याकडून बंडाचा इशारा देण्यात आला आहे. भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांनाच तिकीट दिल्याने त्या प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे उमेदवारी जाहीर न झाल्याने नाराज असणाऱ्यांनी मुंबईकडे धाव घेत फडणवीसांची भेट घेतली आहे तर, सत्यजित तांबे मात्र भंडारदरा धरण संदर्भातील काही कामे असल्याने फडणवीसांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे.

पुणे शहरातील तीन विद्यमानांना पुन्हा संधी तर तीन जागांवर सस्पेन्स कायम…

भाजपच्या पहिल्या यादीत कोण-कोण?

1) नागपूर दक्षिण पश्‍चिम – देवेंद्र फडणवीस

2) कामठी – चंद्ररशेखर बावनकुळे

3) शहादा (आजजा) – राजेश पाडवी

4) नंदुरबार (अजजा) – विजयकुमार गावीत

5) धुळे शहर – अनुप अग्रवाल

 

6) शिंदखेडा – जयकुमार रावल

 

7) शिरपूर (अजजा) – काशिराम पावरा

 

8) रावेर – अमोल जावळे

 

9) भुसावळ (अजा) – संजय सावकारे

10) जळगांव शहर – सुरेश भोळे

11) चाळीसगाव – मंगेश चव्हाण

12) जामनेर – गिरीश महाजन

13) चिखली – श्वेता महाले

14) खामगांव – आकाश फुंडकर

15) जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे

16) अकोला पूर्व – रणधीर सावरकर

 

17) धामणगांव रेल्वे – प्रताप अडसद

 

18) अचलपूर – प्रवीण तायडे

19) देवळी – राजेश बकाने

20) हिंगणघाट – समीर कुणावार

21) वर्धा – डॉ. पंकज भोयर

22) हिंगणा – समीर मेघे

23) नागपूर-दक्षिण – मोहन माते

24) नागपूर-पूर्व – कृष्णा खोपडे

25) तिरोडा – विजय रहांगडाले

27) आमगाव (अजजा) – संजय पुराम

28) आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे

29) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

30) चिमूर – बंटी भांगडिया

31) वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार

32) राळेगांव – अशोक उइके

33) यवतमाळ – मदन येरावार

34) किनवट – भीमराव केराम

35) भोकर – श्रीजया चव्हाण

36) नायगांव – राजेश पवार

37) मुखेड – तुषार राठोड

38) हिंगोली – तानाजी मुटकुले

39) जिंतूर – मेघना बोर्डीकर

40) परतूर – बबनराव लोणीकर

41) बदनापूर (अजा) – नारायण कुचे

42) भोकरदन – संतोष दानवे

43) फुलंब्री – अनुराधा चव्हाण

44) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

45) गंगापूर – प्रशांत बंब

46) बागलान (अजजा) – दिलीप बोरसे

47) चंदवड – डॉ. राहुल अहेर

48) नाशिक पूर्व – अॅड. राहुल ढिकाले

49) नाशिक पश्चिम – सीमा हिरे

50) नालासोपारा – राजन नाईक

Congress First list : मोठी बातमी! काँग्रेसच्या 54 उमेदवारांची यादी निश्चित; महत्त्वाची नावं आली समोर

51) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले

52) मुरबाड – किसन कथोरे

53) कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड

54) डोंबिवली – रवींद्र चव्हाण

55) ठाणे – संजय केळकर

56) ऐरोली – गणेश नाईक

57) बेलापूर – मंदा म्हात्रे

58) दहिसर – मनिषा चौधरी

59) मुलुंड – मिहिर कोटेचा

60) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर

61) चारकोप – योगेश सागर

62) मलाड पश्चिम – विनोद शेलार

63) गोरेगाव – विद्या ठाकूर

64) अंधेरी पश्चिम – अमित साटम

65) विले पार्ले – पराग अळवणी

66) घाटकोपर पश्चिम – राम कदम

67) वांद्रे पश्चिम – अॅड. आशिष शेलार

68) सायन कोळीवाडा – आर. तमिल सेल्वन

69) वडाळा – कालिदास कोळंबकर

70) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

71) कोलाबा – अ‍ॅड. राहुल नार्वेकर

72) पनवेल – प्रशांत ठाकूर

73) उरण – महेश बाल्दी

74) दौंड – अ‍ॅड. राहुल कुल

75) चिंचवड – शंकर जगताप

अजितदादांना आणखी एक धक्का; अखेर राजेंद्र शिंगणेंच्या हाती ‘तुतारी’, पण पुतणीने टेन्शन वाढविले

76) भोसरी – महेश लांगडे

77) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे

78) कोथरूड – चंद्रकांत पाटील

79) पार्वती – माधुरी मिसाळ

80) शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

81) शेवगांव – मोनिका राजळे

82) राहुरी – शिवाजीराव कार्डिले

83) श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते

84) कर्जत जामखेड – राम शिंदे

85) केज (अजा) – नमिता मुंदडा

86) निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर

87) औसा – अभिमन्यू पवार

88) तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील

89) सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख

90) अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी

91) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख

92) माण – जयकुमार गोरे

93) कराड दक्षिण – अतुल भोसले

94) सातारा – शिवेंद्रराजे भोसले

95) कणकवली – नितेश राणे

96) कोल्हापूर दक्षिण – अमोल महाडिक

97) इचलकरंजी – राहुल आवाडे

98) मिरज – सुरेश खाडे

99) सांगली – सुधीर गाडगीळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube