देवेंद्र फडणवीस अडचणीत, ‘व्होट जिहाद’ प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना व्होट जिहाद शब्द वापरल्याने काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संदेश सिंगलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली आहे.
यावेळी संदेश सिंगलकर (Sandesh Singalkar) म्हणाले की भाजपचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात भाषण करताना राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी 14 जागांवर व्होट जिहाद झाल्याने दिसून येत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र घटनेच्या कलम 64 नुसार सार्वभौम आणि एकात्मता जपण्याची शपथ लोकप्रतिनिधीला दिली जाते. जर गृहमंत्री अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर ते चितावणीखोर आहे आणि कायद्याला अनुसरून नाही त्यामुळे आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संदेश सिंगलकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कोल्हापूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले होते की, काही लोकांना वाटते की आमची संख्या कमी असली तरी संघटित मतदानाने आम्ही हिंदुत्व समर्थकांचा पराभव करू शकतो. त्यांनी यावेळी मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराविरोधात झालेल्या मतदानाचा उल्लेख केला होता. तसेच यावेळी त्यांनी लव्ह जिहादबाबत एक लाखाहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची देखील माहिती दिली होती.
उमेदवारी न बदलल्यास…, इशारा देत मुंडे व दौंड यांनी राजळेंविरोधात थोपटले दंड
लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी 31 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत महायुतीला मोठा धक्का दिला होता. भाजपला लोकसभा निवडणुकीत 9 जागांवर विजय मिळाला होता तर काँगेसला 13 जागांवर विजय मिळवता आला होता.