Atul Subhas : पत्नीचा जाच; पतीने 24 पानांची चिठ्ठी लिहून जीवनयात्रा संपवली…
Atul Subhas : पत्नीची त्रासाला कंटाळून एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय अभियंत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडलीयं. अतुल सुभाष (Atul Subhash) असं या व्यक्तीचं नाव असून महिंद्रा कंपनीत ते आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये डीडीएम पदावर कार्यरत होते. पत्नीने त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करुन त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. तर पत्नीकडून अडमाप रक्कमेची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे अतुल सुभाष यांनी 24 पानांची चिठ्ठी लिहून जीवन संपवलंय.
आत्महत्येपूर्वी बनवला व्हिडिओ
अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली संपूर्ण हकिगत सांगितली. आपल्या पत्नीने खोट्या केसमध्ये फसवलं असून तिने कटकारस्थान करुन मला अडकवलंय. मागील दोन वर्षांपासून बंगळूरमधून जौनपूरला न्यायलयाच्या तारखेला यावं लागत आहे.
पत्नीच्या या त्रासाला आपण कंटाळलो असल्याचा दावा अतुल सुभाष यांनी केलायं.
आपल्या व्यथा मांडताना अतुलचे वडील पवन कुमार म्हणाले की, न्यायालयात लोक कायद्यानुसार काम करत नाहीत, असे त्यांच्या मुलाने सांगितले होते. ते सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार काम करत नाहीत. त्यांना पुन्हा पुन्हा जौनपूरला बोलावण्यात आले. अतुल सुभाष यांने कधी आपल्याला होत असलेला त्रास आम्हाला दाखवू दिला नाही पण अचानक आत्महत्या केली असल्याचं अतुलचे वडील पवन कुमार यांनी म्हटलंय.
मुंबईसह नाशिक, धुळे थंडीने गारठलं; उत्तरेकडील वाऱ्यांनी 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
सुसाईडमध्ये व्यक्त केल्या इच्छा…
24 पानांच्या चिठ्ठीत अतुल सुभाष यांनी आपली एक इच्छा व्यक्त केलीयं. अतुल सुभाष यांच्याविरोधात सुरु असलेला खटला लाईव्ह झाला पाहिजे, कारण देशातल्या नागरिकांना कायदेशीर पद्धतीबाबत माहिती मिळेल. माझ्या मुलांची कस्टडी माझ्या परिवाराला देण्यात यावी, कारण माझे कुटुंबिय मुलांवर चांगले संस्कार करतील. अतुलच्या सासरकडील व्यक्तींना त्यांच्या मृतदेहाच्या जवळ येण्याची परवानगी दिली जाऊ नये. जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत माझ्या अस्थीचं विसर्जन करु नये, अशा इच्छा अतुल सभाष यांनी सुसाईड नोटमध्ये व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अतुलच्या पत्नीने त्याच्यावर कौंटुबिक हिंसाराचा आरोप केलायं. यामध्ये अतुल याने हुंड्यासाठी आपल्या सासऱ्यांची हत्या केल्याचा आरोप पत्नीकडून करण्यात आलायं. मात्र, अतुलच्या सासऱ्यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती असून मागील 10 वर्षांपासून ते आजारी होते. तसेच अतुलने उत्तर प्रदेशातील एका न्यायाधीशावरही आरोप केला असून प्रकरण मिटवण्यासाठी न्यायाधीशाने पाच लाख रुपयांची मागणी केली असल्याचाही आरोप अतुलने केलायं.