वेळ अन् पद्धत आमचं सैन्य ठरवणार! PM मोदींचा पाकिस्तानला उघड इशारा, दहशतवादाविरोधात भारताची त्रिसूत्री

PM Modi Said Operation Sindoor 3 Principles Against Terrorism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज बिकानेरमध्ये पाकिस्तानला उघड इशारा दिलाय. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) तीन तत्वांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, भारतावर दहशतवादी हल्ला (Terrorism) झाल्यास योग्य उत्तर दिलं जाईल. भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरणार नसल्याचं देखील (Ind Pak Tension) पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे जाहीर सभेत सांगितलंय.
दहशतवादाविरोधात भारताची त्रिसुत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेर येथे ऑपरेशन सिंदूरचे यश सांगत पाकिस्तानला खुलं आव्हान दिलंय. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा सामना करण्यासाठी तीन तत्वे निश्चित केली आहेत. यापैकी पहिला इशारा म्हणजे भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास भारत गप्प बसणार नाही. त्याला योग्य उत्तर मिळेल. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि पद्धत आपल्या सैन्याने ठरवली पाहिजे, असं मोदींनी म्हटलंय. दुसरे तत्व म्हणजे – भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरणार नाही.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही एन्ट्री; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद
ऑपरेशन सिंदूरच्या तिसऱ्या तत्वात पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला उघड इशारा दिलाय. त्यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. तिसरे तत्व म्हणजे आपण दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार यांना वेगळे पाहणार नाही, तर आपण त्यांना एक मानू. पाकिस्तानच्या राज्य आणि राज्याबाहेरील घटकांचा हा खेळ आता चालणार नाही.
#WATCH | Rajasthan | Addressing a public rally in Deshnoke, Bikaner, PM Modi says, “… Operation Sindoor has decided three formulas to fight terrorism. First, if there is a terror attack in India, then they will get a befitting reply. Our forces will decide the time, method and… pic.twitter.com/vAzsxBHGF3
— ANI (@ANI) May 22, 2025
पहलगाम हल्ल्याची आठवण
यावेळी पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याची आठवण करून दिली. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींच्या धर्माबद्दल विचारून त्यांच्या कपाळावरील कुंकू पुसलं होतं. खरंतर 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी नि:शस्त्र लोकांना ठार मारले, 26 लोक मृत्युमुखी पडले. पहलगाममध्ये झाडलेल्या गोळ्या 140 जनतेच्या छातीत घुसलंया. यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाने एकजूट होऊन दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा संकल्प केला. आज तुमच्या आशीर्वादाने आणि देशाच्या सैन्याच्या शौर्यामुळे, आपण सर्वांनी त्या प्रतिज्ञेचे पालन केलंय, असं देखील मोदींनी म्हटलंय.
मोदी सरकारने उचललं मोठं पाऊलं; आता UPI द्वारे पेमेंटपूर्वी होणार मोबाईल नंबरची ‘फ्रॉड’ चेकिंग
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने तिन्ही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. तिन्ही सैन्यांनी मिळून असा चक्रव्यूह निर्माण केला की, पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. 22 तारखेला झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, आम्ही 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे 9 सर्वात मोठे अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर बारूदात बदलतो, तेव्हा काय होते हे जगाने आणि देशाच्या शत्रूंनी देखील पाहिले आहे.
आज राजस्थानच्या भूमीवरून मी देशवासियांना मोठ्या नम्रतेने सांगू इच्छितो की, जे लोक सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते ते मातीत मिसळले गेले आहेत. ज्यांनी भारताचे रक्त सांडले, त्यांनी आज त्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली आहे. ज्यांना वाटले होते की भारत गप्प राहील ते आज त्यांच्या घरात लपून बसले आहेत. त्याच वेळी, पंतप्रधान मोदींनी चीनवर निशाणा साधला आणि म्हणाले की ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा अभिमान होता ते आज ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.