आधी बिश्नोई गॅंगकडून धमकी, आता सलमान खानच्या इमारतीत घुसखोरी, संशयीताला घेतले ताब्यात…

आधी बिश्नोई गॅंगकडून धमकी, आता सलमान खानच्या इमारतीत घुसखोरी, संशयीताला घेतले ताब्यात…

Bollywood News: अभिनेता सलमान खानला (Salman Khan) बिश्नोई गँगकडून (Bishnoi Gang) नेहमीच जीवे मारण्याची धमकी येत असतात. अशाताच आता सलमानच्या इमारतीत एका अज्ञात तरुणाने प्रवेश केल्याचं समोर आलं होतं. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपी तरुण हा छत्तीसगडचा रहिवासी असून त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलिस (Bandra Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची नजर चकवून आरोपी इमारतीत घुसला होता. स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

रायगडच्या रोहा एमआयडीसीत 105 कोटींची ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर; हजारो युवकांना मिळणार प्रशिक्षण 

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात तरुणाने प्रवेश केल्यामुळं एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. आरोपी तरुण पोलिसांची नजर चुकवू मोटारगाडीच्या मागे लपला. त्यामुळं तरुण सलमान खानच्या इमारतीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला. पण हा प्रकार तत्काळ पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाचे नाव जितेंद्रकुमार सिंग असं असून तो छत्तीसगडमधील रहिवासी आहे. इमारतीत प्रवेश करण्याच्या काही तास आधी जितेंद्रकुमार सिंहला गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर फिरत असताना पोलिसांनी हटकले होते. दरम्यान, गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञात तरुणाने प्रवेश केल्यानं खळबळ उडालीय होती.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही एन्ट्री; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद 

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२९ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा तपास करत आहे. दरम्यान, एवढी सुरक्षा असतानाही हा तरुण सलमान खानच्या घरात घुसलाच कसा असा प्रश्न निर्माण झालाय.

यापूर्वी सलमानला धमकी…
यापूर्वीही सलमान खानला मारण्याची धमकी दिल्याचा संदेश वाहतूक पोलिसांना आला होता. त्यात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणी वरळी पोलीस तपास करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube