Vanraj Aandekar Murder : राज्याला हादरवून टाकणारी पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीयं. हत्या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आंदेकर हत्या प्रकरणी बहिणींसह मेहुण्यांना अटक केली होती. त्यानंतर आज ताम्हिणी घाटातून 13 जणांना अटक केलीयं.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरु, ‘या’ पद्धतीने करता येणार नाव नोंदणी
हत्येच्या घटनेनंतर हे आरोपी ताम्हिणी घाटात मुक्काम ठोकून होते. जेवणासाठी हे सर्व आरोपी ताम्हिणी घाट परिसरात आले होते. जेवणानंतर ताम्हिणी घाटातून निघतानाच त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील नाना पेठेत रविवारी (दि. 2 सप्टेंबर) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली. वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली. वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या दोन मुली आणि दोन मेव्हण्यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आहे. वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी पोलीस ठाण्यात दिली.
भारतीय संघात नगरच्या किरण चोरमलेची निवड; 19 वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियाला भिडणार
त्यानंतर पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये वनराजच्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांचा मेहुणा जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे. पुणे शहराचे सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली.
बहिणीनींनच काढला काटा…
दरम्यान, गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे. त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडले. यानंतर कुटुंबात वाद सुरू झाला. आंदेकर कुटुंबीयांच्या आशीर्वादानेच गणेश कोमकर गुंडगिरी करत होता. गणेश कोमकर याने स्वतःची टोळी तयार केली होती. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकान अतिक्रमण पाडायला लावल्याच्या रागातून बहिनीने वनराज यांना तुला पोरं बोलवून ठोकतेच अशी धमकी दिली होती. त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला.