Vanraj Andekar Murder : पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) हत्या प्रकरणाने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे वनराज आंदेकर खून प्रकरण हे गॅंगवार असल्याची चर्चा आहे. तर हे हत्या प्रकरण कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेव्हण्यांना अटक केली आहे. पुणे शहर सहआयुक्त रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) यांनी याबाबतची माहिती दिली.
Sonu Sood: सोनू सूदने एका नवीन व्हिडिओ मधून दिलं फिटनेस मोटिवेशन
पुण्यातील नाना पेठेत रविवारी (दि. 2 सप्टेंबर) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली. वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली. वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या दोन मुली आणि दोन मेव्हण्यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आहे. वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी पोलीस ठाण्यात दिली.
दोन सख्ख्या बहिणींनीच केला वनराज आंदेकराचा गेम; सुपारी देणाऱ्या मेहुणे अन् बहिणींना अटक
त्यानंतर पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये वनराजच्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांचा मेहुणा जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे. पुणे शहराचे सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली.
बहिणीनींनच काढला काटा…
दरम्यान, गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे. त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडले. यानंतर कुटुंबात वाद सुरू झाला. आंदेकर कुटुंबीयांच्या आशीर्वादानेच गणेश कोमकर गुंडगिरी करत होता. गणेश कोमकर याने स्वतःची टोळी तयार केली होती. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकान अतिक्रमण पाडायला लावल्याच्या रागातून बहिनीने वनराज यांना तुला पोरं बोलवून ठोकतेच अशी धमकी दिली होती. त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला.
कशी झाली वनराज यांची हत्या….?
गणेश कोमकर यांनी यापूर्वी शिवसेनेचे शहराध्यक्ष रामभाऊ पारेख यांच्यावर ॲसिड हल्ला केला होता. वनराज आंदेकर यांना आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता होता. त्यामुळे ते सतत त्यांच्या टोळीतील मुलांसोबत फिरत होते. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्यांच्यासोबत कोणीही मूले नव्हती. घरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री ते डोके तालीमच्या कार्यालयाजवळ ते थांबले. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात वनराज हे गंभीर जखमी झाले होते. चौकातील दिवे बंद असताना आणि ते एकटाच असताना हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी आंदेकर यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, वनराज आंदेकर खून प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले आहे. एकूण 12 हल्लेखोर चार ते पाच कारमधून आल्याचे दिसते. गाडीतून खाली उतरताच त्यांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार सुरू केला. आंदेकर जखमी होताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.