Download App

वसंत मोरेंनी वंचितची साथ सोडली ! कार्यकर्ते संतप्त झाल्याने मोरेंच्या कार्यालयाला पोलिस संरक्षण

मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस बंदोबस्त तैनात.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Vasant More left the support of Vanchit: पुणेः लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी (Vasant More) प्रकाश आंबेडकरांनाही (Prakash Ambedkar) सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आता ते 9 जुलै रोजी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांच्या निर्णयाला वंचित बहुजन (Vanchit Bahujan Agadhi) आघाडीच्या कार्यकर्त्यांना तीव्र विरोध करत संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे काही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून दक्षता घेण्यात आली आहे. पुण्यातील वसंत मोरे यांच्या कात्रजमधील कार्यालयाबाहेर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Vasant More left the support of Vanchit! Police protection to More’s office as activists get angry)


शेळ्या चोरीच्या संशयातून बेदम मारहाण करत एकाचा जीव घेतला; सरपंचासह तीस जणांविरुद्ध गुन्हा

वंचितकडून वसंत मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या कार्यालयाबाहेर सगळा बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.

मुकेश अंबानी पोहोचले राहुल गांधींच्या घरी, सोनिया गांधींचीही घेतली भेट, कारण काय?

येत्या काळात राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. मोरेंनी काही दिवसांपूर्वी खासदारकीचीही निवडणुक लढवली होती. मात्र, तेथे त्यांना दारूण पराभव झाला. त्यानंतर आता त्यांनी विधानसभेसाठी कंबर कसली असून,ते ठाकरे गटाकडून हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या भेटीत या जागांबाबतही ठाकरे आणि मोरेंमध्ये खलबतं झाली असल्याची शक्यता आहे.

हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यास वसंत मोरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असं बोललं जातय. मोरे हे मनसे सोडल्यानंतर वंचितमध्ये गेले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये शेवटपर्यंत राहील, मी सोडणार नाही असं मोरे म्हटले होते. मात्र, आता ठाकरेंच्या भेटीनंतर काय करतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज