त्यांचा बाण मस्जिदीवर तर आमचा द्वेषावर होता; यशोमती ठाकुरांचा नवनीत राणांवर बाण!

त्यांचा बाण मस्जिदीवर तर आमचा द्वेषावर होता; यशोमती ठाकुरांचा नवनीत राणांवर बाण!

Yashomati Thakur Criticize Navneet Rana for act of shooting arrow : नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमच्या धनुष्यबाण चालवण्याची कृती करण्यामध्ये एक फरक होता. त्यांचा बाण मस्जिदीवर तर आमचा द्वेषावर होता. असं म्हणत कॉंग्रेस आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर काढलेल्या रोड शोमध्ये आपण केलेल्या बाणाच्या कृतीचा खास किस्सा सांगितला. यशोमती ठाकूर यांनी लेट्स मराठीला मुलाखत दिली. यावेळी संपादक योगेश कुटे यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

Video : टीम इंडिया मुंबईत दाखल, मरीन ड्राइव्हवर चाहत्यांचा महासागर, पहा व्हिडिओ

दरम्यान अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी भाजपच्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतर आयोजित रोड शोमध्ये आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नवनीत राणांप्रमाणेच गाडीवर उभं राहून धनुष्यबाण चालवण्याची कृती करत राणांना डिवचलं होतं.

मुकेश अंबानी पोहोचले राहुल गांधींच्या घरी, सोनिया गांधींचीही घेतली भेट, कारण काय?

या रोड शोचा किस्सा सांगताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, बळवंत वानखडे निवडून आल्यानंतर आम्ही पाच लोक सर्टिफिकेट आणण्यासाठी गेलो. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला की, ताई तुम्ही परत अमरावती कधी येणार? त्यामुळे तुम्ही राजकमल चौकामध्ये यायलाच हवं. त्यावेळी मी सर्व युवा कार्यकर्त्यांनीच्या रॅलीत सहभागी झाले.

तिथे हनुमान चालीसा देखील लावलेली होती. तेव्हा ओपन टॉपच्या गाडीमधून जात असताना कार्यकर्त्यांनी मला धनुष्यबाण चालवण्याची कृती करण्याचा आग्रह केला. कार्यकर्ते म्हणाले भाजपच्या हैदराबादचे उमेदवार माधवी लता आणि अमरावतीच्या नवनीत राणा यांनी ज्याप्रमाणे बाणाची कृती केली. तशीच करा. मी ती कृती केली. मात्र त्यामध्ये एक फरक होता. त्यांचा बाण हा मस्जिदीवर होता. माझा बाण मात्र द्वेषाच्या राजकारणावर होता. असं म्हणत ठाकूर यांनी राणा यांना टोला लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube