Video : टीम इंडिया मुंबईत दाखल, मरीन ड्राइव्हवर चाहत्यांचा महासागर, पहा व्हिडिओ

Video : टीम इंडिया मुंबईत दाखल, मरीन ड्राइव्हवर चाहत्यांचा महासागर, पहा व्हिडिओ

Team India Victory Parade : T20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर आज भारतीय संघ (Team India) मायदेशी परतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेऊन आता भारतीय संघ मुंबईत दाखल झालं आहे.

मुंबई (Mumbai) भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यावर चाहत्यांचा महासागर दिसून येत आहे. सध्या मुंबईत जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे मात्र तरी देखील भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यावर लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते उभे आहे.

T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर आज (4 जुलै) सकाळी भारतीय दिल्लीत पोहोचला. दिल्लीत देखील भारतीय संघाचा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आला.

आमदारांचा निरोप समारंभ अन् देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले, जयंत पाटील हे कधी आमच्या …

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज