पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही; जम्मूकाश्मीरमध्ये लवकरच होणार विधानसभा निवडणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही; जम्मूकाश्मीरमध्ये लवकरच होणार विधानसभा निवडणूक

PM Modi visit Jammu And Kashmir : जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir) या केंद्रशासित प्रदेशालाही राज्याचा दर्जा परत मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. येथे विधानसभा निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. (PM Modi) श्रीनगरमध्ये दीड हजार कोटी रुपयांच्या ८४ विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते एका कार्यक्रमत बोलत होते. (Jammu Kashmir Assembly) ते म्हणाले की केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशात नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले गांभीर्याने घेतले असून शत्रूंनाही चोख प्रत्युत्तर दिलंय.

काश्मीरचा विकास सरकारची ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा हवेत विरली! परीक्षा रखडलेल्याच, विद्यार्थी अस्वस्थ

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांचं कौतुक केलं. ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आलेल्या अनुच्छेद ३७० नंतर जम्मू आणि काश्मीरला विकासाची फळे चाखायला मिळाली. आज भारतीय संविधान खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरमध्ये लागू झालं आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दहशतवादी हल्ले  गांभीर्याने घेतले

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘केंद्र सरकारने अलीकडील दहशतवादी हल्ले अतिशय गांभीर्याने घेतले आहेत. गृहमंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला आहे. तसंच, मी खात्री देऊ इच्छितो की आम्ही जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना शिक्षा देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी सूर्याचं वादळ अन् बुमराहचा कहर.. टीम इंडियाकडून अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव

शांतता आणि मानवतेच्या शत्रूंना जम्मू-काश्मीरची प्रगती आवडत नाही. आज ते जम्मू-काश्मीरचा विकास रोखण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी २००० हून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचं वाटपही करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज