ब्रॅंड हा ब्रॅंड असतो, ब्रॅंडला कॉपी करणारे अनेक…; नवनीत राणांचे यशोमती ठाकूरांवर टीकास्त्र

ब्रॅंड हा ब्रॅंड असतो, ब्रॅंडला कॉपी करणारे अनेक…; नवनीत राणांचे यशोमती ठाकूरांवर टीकास्त्र

 

Navneet Rana on Yashomati Thakur : अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी भाजपच्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतर आयोजित रोड शोमध्ये आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नवनीत राणांप्रमाणेच गाडीवर उभं राहून धनुष्यबाण चालवण्याची कृती करत राणांना डिवचलं होतं. यशोमती ठाकूर यांच्या या कृतीवर नवनीत राणा यांना भाष्य केलं.

संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ ची घोषणा देणाऱ्या ओवैसींची जाणार खासदारकी? थेट राष्ट्रपतींना पत्र 

नवनीत राणा आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना यशोमती ठाकूर यांच्या कृतीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मी जी कृती करते, ती ओरिजनल असते. खरंतर ब्रॅंडला कॉपी करणारे अनेक जण असतात. पण ब्रँड हा ब्रँडच असतो, अशी टीका राणा यांनी केली.

शारीब हाश्मीसह स्क्रीन शेअर करणार अमृता; पाहा दोघांचे खास फोटो 

अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यात आगामी काळात राजकीय सामना पाहायला मिळेल का? असे विचारले असता, माझी कोणाशीही सामना नाही. मी जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहीन, असं राणा म्हणाल्या.

नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुत घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मी कोणावर काही बोलणार नाही. मी माझे काम जनतेसाठी करते, कोणत्या नेत्यासाठी करत नाही. मी जनतेच्या भरवशावर मी निवडणूक लढले. मी कोणावरही अवलंबून राहून निवडणूक लढवली नाही. असे नवनीत राणा यांनी सांगितले.

दरम्यान, नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर आता कॉंग्रेस किंवा यशोमती ठाकूर काय पतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज