Vasant More यांची पोस्ट व्हायरल! पुण्यात महिलांच्या हाती कोयता?

पुणे (Pune) : सकाळी शुक्रवारी (दि. १०) जीमला चाललो होतो. अचानक समोर तीन महिला (Women) भगिनी हातात कोयता घेवून चालत चालल्या होत्या. अन मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का? की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या आहेत. मी थोडा त्यांचे मागे गेलो, तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या, असा […]

Vasant More1

Vasant More1

पुणे (Pune) : सकाळी शुक्रवारी (दि. १०) जीमला चाललो होतो. अचानक समोर तीन महिला (Women) भगिनी हातात कोयता घेवून चालत चालल्या होत्या. अन मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का? की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या आहेत. मी थोडा त्यांचे मागे गेलो, तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या, असा अनुभव सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) केला आहे. वसंत मोरे यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होती.

वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाणमध्ये सकाळी ६ वाजता भररस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोर रस्त्याने चक्क पळत गेला होता. त्यावेळी पोलिसांनी कडक कारवाई नाही केली. त्यामुळे पुणे महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न मला पडला. त्यामुळे पोलिसांनी अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा खरोखरच महिला कोयता घेऊन फिरत असल्याचे चित्र पुणे शहरात दिसले तर नवल वाटून घेवू नये.

Exit mobile version