वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन; बडा नेता हाताशी येताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घेरले

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.

Letsupp Image   2024 07 09T153049.886

Letsupp Image 2024 07 09T153049.886

Vasant More Joins Shivsena UBT : लोकसभा निवडणुकीत मनसेला धक्का देत वंचित बहुजन आघाडीत सहभागी झालेले फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी (Vasant More) पुन्हा एकदा पक्ष बदलला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलला आहे. वसंत मोरे यांनी आज थेट मुंबई गाठली. उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) हजेरीत शिवबंधन हाती बांधलं. (Vasant More Join Shivsena UBT)

रोहित पाटलांना प्रभाकर पाटलांचे आव्हान; तासगावात भिडणार दोन तगडे तरुण…

पुण्यातला मोठा नेता पक्षात आल्याने उद्धव ठाकरेंनाही स्फुरण चढलं आणि त्यांनी पहिलाच शाब्दिक टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांना (Raj Thackeray) लगावला. ठाकरे म्हणाले, शिवसेनेत स्वगृही (Shivsena UBT) परतलेल्या सर्व बांधवांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Election) वसंतराव काय करणार याकडं सर्वांचं लक्ष होतं. मोरे आधी शिवसैनिक होते. मध्यंतरी ते दुसऱ्या पक्षात गेले. पण इतर पक्षात सन्मान मिळतो का, काय वागणूक दिली जाते याचा अनुभव घेऊन ते अधिक परिपक्व होऊन आता स्वगृही आले आहेत.

चमकोगिरीचा हव्यास नडला; पुण्यातील अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली

आता शिवसेना सोडली म्हणून तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे ती शिक्षा म्हणजे पूर्वीपेक्षा अधिक पटीने पुण्यात शिवसेना वाढली पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत आपण संविधान रक्षणाची लढाई लढलो आणि जिंकलो. आता विधानसभा निवडणुकीत गद्दादी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरोधात लढा द्यायचा आहे. एकेकाळी पुण्यात शिवसेनेचे पाच आमदार होते ते दिवस मला पुन्हा आणायचे आहेत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

वडेट्टीवारांची काम थांबवण्याची मागणी; महाजनांकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, सभागृहात जोरदार घमासान

वसंत मोरे काय म्हणाले?

यावेळी वसंत मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मी आधी शिवसेनेतच होतो. बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर 1992 साली कात्रजमध्ये शिवसेनेच्या शाखा प्रमुखाची जबाबदारी हाती घेतली. आज माझ्याबरोबर आणखीही काही लोक येत आहेत. मी मूळचा शिवसेनेचा असल्याने आज पुन्हा शिवसेनेत परतत आहे, अशा शब्दांत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version