Video : पुण्यातून उडणाऱ्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ.. फडणवीस दादांनंतर टाकणार होते डाव

Devendra Fadnavis जेव्हा आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही. अशा स्थितीत आम्ही काहीही जाहीरनामे काढतो

Video : पुण्यातून उडणाऱ्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ..दादांना फडणवीसांनी आरसा दाखवला

Video : पुण्यातून उडणाऱ्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ..दादांना फडणवीसांनी आरसा दाखवला

Devendra Fadnavis on Ajit Pawar Election Promise : पुणे महानगरपालिकांच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणेकरांवर मोफत मेट्रो आणि पीएपीएमएल बसच्या मोफत प्रवासासह अनेक घोषणा केल्या आहेत. दादांची मोफत प्रवासाची घोषणेची जरी  शहरभर चर्चेनंतर फडणवीस मोठा डाव टाकणार होते. याबाबत त्यांनी खुद्द भाष्य करत दादांना खास शैलीत टोला लगावला आहे. खरंतर मी आज घोषणा करणार होतो की एवढेच काय तर, मी पुण्यातून उडणारी जेवढी विमानं आहेत, त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. घोषणा करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं घोषणा करायला?” असा खोचक टोला फडणवीसांनी लगावत दादांना आरसा दाखवला आहे. ते संवाद पुणेकरांशी या कार्यक्रमात बोलत होते.

15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नाहीत, फक्त देवेंद्र फडणवीस बोलेल…

दादांनी दिलेलं आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही

अजित पवारांनी दिलेले हे मोफतचे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही हे पुणेकरांना माहिती आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. पुणेकरांना उत्तम मेट्रो आणि बसची सेवा हवी आहे. या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत ही त्यांची अपेक्षा आहे. आणि यासाठी किमान खर्च आहे तो पुणेकर देतील. त्यामुळे दादांचं जे आश्वासन आहे ते आश्वासन आहे हे पुणेकरांना समजलं आहे. जे पूर्ण होऊ शकत नाही हेही त्यांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडून येण्याचा विश्वास नसतो तेव्हाच…

अनेक वेळा आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक निवडणुका जिंकण्याच्या डेस्पिरेशनमध्ये, जेव्हा आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही. अशा स्थितीत आम्ही काहीही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काहीह म्हणतो. तरीही माझं म्हणणं आहे की, किमान लोकांचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टीं सांगितल्या पाहिजे. ज्या आपण करू शकू. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासने देऊ नयेत असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिला.

Video : चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म मोडला का?, अजित पवारांचा पुन्हा भाजपवर वार

माझ्या मनात आलं तरी तिकीट माफ करणं शक्य नाही

दादांच्या मोफत मेट्रोच्या आश्वासाची सोप्या भाषेत फोड करून सांगताना फडणवीस म्हणाले की, मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाहीये. मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोच्या बॉडीचे अध्यक्ष हे केंद्रिय सचिव असतात आणि एमडी हे महाराष्ट्राचे असतात. दुसरं, कुठल्याही मेट्रोचे आपण फेअर फिक्सेशन करतो, त्यावेळी कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झालेली आहे आणि त्या कमिटीलाच कायद्याने दिलेले अधिकार आहेत. उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं, तरी मला करता येत नाही. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे. ऑपरेशनल खर्चतरी निघाला पाहिजे. समाजा जर हा खर्च तुम्ही काढणार नसाल आणि सवलत द्याची असेल तर तुम्ही कुठून पैसे देणार हे सांगा,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Exit mobile version