पुण्यात सांगता सभेत आशीर्वाद मिळतो; अलार्म बंद करा अन् कमळाला विजयी करा; फडणवीसांचा दादांना पंच

निवडणुकांच्या रणधुमाळीत काहीजण खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असा टोलादेखील फडणवीसांनी दादांचे नाव न घेता लगावला. 

Letsupp Image (12)

Letsupp Image (12)

Devendra Fadnavis Attack On Ajit Pawar In Pune :  पुण्यात निवडणुकांच्या प्रचाराची सांगता सभा घेतली की, आशीर्वाद मिळतो असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. ते शिवाजीनगर येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. प्रचाराची सांगता सभा पुण्यातील शिवाजी नगर भागात करायची याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे शिवाजी मतगार संघ म्हणजे आपलं आराध्य दैवत छ.शिवाजी महाराजांच्या नावाने असलेला एकमेव मतदार संघ आहे. त्यामुळे या ठिकाणी सांगता सभा घेण्याचा निर्धार केल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्याशिवाय या ठिकाणी सांगता सभा घेतली की, आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळतो आणि भाजपला बहुमत मिळतं आणि म्हणून मी ठरवलं की, सांगता सभेसाठी हीच जागा आम्हाला शुभं आहे.

Video : लवकरच गुड न्यूज! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र…, अजित गव्हाणे यांचं लेट्सअप मराठीवर मोठं वक्तव्य

काहींना वाटतं पालिका निवडणूक गल्लीमधला दादा तयार करण्याची आहे पण.. 

काही लोकांना वाटतं की महापालिका निवडणूक गल्ली मधला दादा तयार करण्याची आहे पण या निवडणुकीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. पुण्यात भाजपची ५ वर्ष सत्ता होती तेव्हा २२० प्रकल्प आपण केले आणि पुढच्या ५ वर्षात ४४ हजार करोड रुपयांचे आणखी प्रकल्प आपण केले आहेत. ठोस नियोजनाचा आराखडा पुण्यासाठी तयार केला आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो सेवेचा ट्रायल रन केला आहे. काही लोकांनी विकासाच्या नावाखाली बिनडोकपणे कामं केली असल्याचा टोलाही फडवीसांनी अजितदादांना लगावला. Devendra Fadnavis Attack On Ajit Pawar In Pune

अलार्म वाजला की बंद करायचा

यावेळी फडणवीसांनी अजित पवारांनादेखील डिवचले. १५ तारखेला मतदानादिवशी सकाळी उठायचं, घड्याळाचा गजर (अलार्म) लावायचा ते घड्याळ बंद करायचं, मतदान केंद्रावर जायचं कमळ पाहायचं उमेदवाराचा चेहरा पाहायचा, एक गोष्ट लक्ष ठेवायची फक्त कमळाचे बटण दाबायचं १५ तारखेला कमळाची काळजी घेतली तर पुढची ५ वर्ष आम्ही तुमची काळजी घेतो असा शब्ददेखील फडणवीसांनी पुणेकरांना यावेळी दिला.

Video : पुण्यातून उडणाऱ्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ.. फडणवीस दादांनंतर टाकणार होते डाव

खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा 

भाजपच्या नेतृत्वात आता आम्ही पुढील २० वर्षाचा विचार करत असल्याचे सांगत तुम्ही निवडून देणारे नगरसेवक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे या राज्याचा मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे. जितका निधी लागेल तितका निधी मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला देईल. मला कोणावर टीका करायची नाही. आश्वासन देताना आपण कुठून पूर्ण करणार आहोत हे माहिती नाही. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी पुण्यात एक म्हण आहे असे म्हणत फडणवीसांनी अजित पवारांना पंच लगावला.

आपला महापौर बसणार आहे पुढच्या वेळेस मी विचारणार आहे की लखपती दीदी यांना किती जणांनी बनवलं आणि तरच त्यांना पुढच्या वेळेस तिकीट देणार असल्याचे फडणवीसांनी सांगून टाकलं. पुण्याच्या विकासाची चिंता करू नका. ती जबाबदारी माझी आहे. ही महापालिका भाजपच्या ताब्यात द्या असे आवाहन त्यांनी पुण्यातील मतदारांना केले. काही लोक मनात येतील ती आश्वासने देत आहेत असं सांगत त्यांनी अजित पवारांवर यावेळी टीका केली. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असा शब्दही फडणवीसांनी महिला मतदारांना यावेळी दिला.

 

Exit mobile version