Ravindra Dhangekar On Jain Bording Land Case : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द झाल्यानंतर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी जैन मुनींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मी विकृती विरोधात बोलतोय आणि उद्याही बोलत राहणार असल्याचे सांगितले आहे. समाजाला दिलेला शब्द आज खरा ठरला असा वाटतोय. मी आजही विकृतीविरोधात बोलतोय, भाजपविरोधात नाही. निलेश घायवळ कसा पळाला, तो विषय अजून संपलेला नाही. या लढाईत शिंदेंनी मला कुठेही अडवलेलं नाही. शिंदेंचा शब्द खरा ठरला, त्यांचे मी आभार मानतो. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो,” असं धंगेकर म्हणाले. ते जैनमुनींच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोठी बातमी! अखेर गोखले बिल्डरकडून जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द; म्हणाले, नैतिकतेच्या
तिसरा अंक सुरू झाला तर, राजकीय जीवनाची चिरफाड करेल
धंगेकर म्हणाले की, जैन धर्माबरोबर मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. हा समाज व्यापारी असून अहिंसेविरोधातील आहे. या समाजाकडे कायम दानशूर म्हणून बघितले जाते. जैन बोर्डिंगच्या विटेलापण मी हात लावू देणार नाही हे मी पहिल्याच दिवशी सांगितले होते. ही शक्ती मला भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच मिळाली. कारण, संत आणि देव यांच्याशिवाय देश चालत नाही. त्यातूनचं मी स्फूर्ती घेऊन मी समाजाला शब्द दिला होता तो आज मला खरा ठरल्याचे जाणवत असल्याचे धंगेकर म्हणाले. माझी कोणाच्याही कुटुंबाशी लढाई नाही असे ते म्हणाले. कोणामध्ये खुमसुमी असेल तर माझ्याविरोधात लढा असे सांगत या प्रकरणाचे दोन अंक पूर्ण झाले असून, तिसरा अंक सुरू झाला तर, राजकीय जीवनाची चिरफाड करेल असा इशार धंगेकरांनी मोहळ (Murlidhar Mohol) यांना दिला आहे.
फडणवीसांना विनंती करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. कारण, त्यांनी मला रोखलं नाही, माझ्यावर कारवाई केली नाही. मी विकृतीच्या विरोधात बोलत राहील. शिंदेंनी सांगितलं होतं की, महायुतीमधल्या पक्षांवर बोलू नका, असेही धंगेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. माझा लढा संपला नाही, घायवळवर अजून बोलणार आहे. तो कसा पळून गेला, त्यावर पण बोलेन, माझा लढा सुरूच आहे, असे धंगेकर यांनी म्हटलं. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो, यात कोण गुन्हेगार होते, कोण दोषी होते, त्यांना शिक्षा व्हावी अशी विनंती फडणवीसांना करणार असलयाचेही यावेळी धंगेकरांनी स्पष्ट केले.
जैन बोर्डिंग प्रकरण पुन्हा पेटणार! मोहोळ यांच्यावर विश्वास नाही, जैन मुनींनी घेतला मोठा निर्णय
आता कुणी पुढाकार घेऊन नये
तुमच्यामुळ हा आवाज दिल्लीत गेला, आता कुणी पुढाकार घेऊ नका. घेणाऱ्याने पुढाकार घेतला. आता खासदार साहेबांनी त्यांची स्वतःची काळजी करावी, पुढे काय होणार आहे ते. त्यांनी 4 हजार कोटी रुपयांचं स्वप्न बघितलं होतं. आता, ते धुळीस मिळेल. चुकीचे लोकं कुठल्याही पक्षात असू द्या, मी लढा देणार. आता माझा मोर्चा लोकमान्य नगरमध्ये वळवणार आहे. निलेश घायवळवर बोलणार आहे, ज्यांना खुमखुमी आहे त्यांना विनंती आहे की, आता माझ्याशी लढाच. मी तयार आहेच. सगळे विषय काढू, लढत राहू. मोहोळ यांच्याशी माझी लढाई आहे, त्यांच्या कुटुंबाशी नाही मंदिर आता वाचलं आहे, मी जिलेबी काढून वाटणार असे म्हणत मोहोळ यांच्या राजीनामावर दोन दिवसांनी बोलू, असेही रविंद्र धंगेकर यांनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर, समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा इथल्या नेत्यांशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. Ravindra Dhangekar On Jain Bording Land Case
जैन बोर्डिंगचा विषय मिटवा अन् मंत्रिपद वाचवा; फडणवीसांची मोहोळांना समज, धंगेकरांनी सगळंच सांगितलं…
या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी जोरदार प्रहार केला आहे. पुण्यातील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वादाच्या केंद्रस्थानी काही नेते असल्याचं उल्लेख त्यांनी केला आहे. बिल्डर आणि काही नेत्यांनी मिळून जागा विकल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालू भूमिकेवरून चांगलाचा समाचार घेतलाय. आम्हाला आश्वासनाची गरज नाही. हा व्यवहार रद्द झाल्याची ऑर्डर आल्यानंतर विश्वास ठेवू, फडणवीसांनी सकारात्मक पाऊल टाकलं यासाठी आभार.दिवाळीनंतर स्थगिती आदेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्याला यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू . अन्यथा आमचा लढा सुरुच राहील असंही ते म्हणाले.
