Apple traders in Pune say they have decided to boycott Turkish apples : भारत आणि पाकिस्तानमध्ये जरी युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला असला तरी, दोन्ही देशांच्या तणाव परिस्थिती तुर्कस्तानने (Turkey) पाकिस्तानला पाठिंबा दिला. भारताविरोधात सरळ पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला आता पुणेकरांनी मोठा आर्थिक दणका देत तीन महिन्यात होणारी 1200 ते 1500 कोटींच्या तुर्की सफरचंदांच्या (Apple) उलाढालीला ब्रेक लावला आहे. पुणेकर व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे आर्थिक कोंडी होऊन तुर्कस्तानला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
व्यापाऱ्यांचा निर्णय नेमका काय?
पुण्यातील एपीएमसी मार्केटमधील सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, भारतासोबतच्या अलिकडच्या तणावात तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर, आता आम्ही सर्व पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्कस्तानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर अनेक ग्राहक हिमाचल आणि इतर भागातील सफरचंद खरेदी करणे पसंत करत असल्याचे झेंडे म्हणाले. हा निर्णय देशप्रेमासाठी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या चीनला दणका; मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’चे अकाऊंट ब्लॉक
तीन महिन्यात होते 1200 ते 1500 कोटींची उलाढाल
पुढे बोलताना झेंडे यांनी सांगितले की, पुण्यात तुर्की सफरचंद ३ महिने विकले जातात. याची तीन महिन्यातील साधारण उलाढाल ही सुमारे 1200 ते 15000 कोटींची आहे. पण, तणावाच्या परिस्थीत तुर्कस्तानने भारताविरोधात उभे राहत पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यांची ही भूमिका पटणारी नसून, देशभक्ती म्हणून लोकांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवलाय आणि लोक डायरेक्ट सफरचंद खरेदीला विरोध करीत आहेत. त्यानंतर आम्हीदेखील तुर्की सफरचंद खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला असून, तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा त्यांना मदत करणारा पहिला देश भारत होता, परंतु त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचेही झेंडे म्हणाले.
#WATCH | Pune, Maharashtra: Following Turkey's support for Pakistan amid recent tensions with India, Apple traders in Pune say they have decided to boycott Turkish apples
Suyog Zende, an apple trader at Pune's APMC market, says, "We have decided to stop buying apples from… pic.twitter.com/tldXdCF4p7
— ANI (@ANI) May 13, 2025
तुर्कस्तानच्या पाठिंब्यानंतर देशभरातून बहिष्कार
सध्या भारतात “Boycott Turkey” (तुर्कीचा बहिष्कार) ही चळवळ जोरात सुरू आहे. या मोहिमेचा उद्देश तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनाच्या निषेधार्थ तुर्कीच्या वस्तू, पर्यटन आणि सेवांचा बहिष्कार करणे आहे. एप्रिल 2025 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईनंतर तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे समर्थन दर्शवले. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याशी बोलून भारताच्या कारवाईचा निषेध केला.
पर्यटनक्षेत्रावरही झाला परिणाम
पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून आयात होणाऱ्या सफरचंदांचा बहिष्कार सुरू केला आहे. तर, उदयपूरमधील मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून होणाऱ्या मार्बलच्या आयातीवर बंदी घातली आहे. या शिवाय पर्यटन क्षेत्रातील Ease MyTrip, Cox & Kings आणि Ixigo यांसारख्या प्रमुख ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानसाठीच्या नवीन बुकिंग्स थांबवल्या आहेत. 2024 मध्ये तुर्कीला 3.3 लाख आणि अझरबैजानला 2.43 लाख भारतीय पर्यटक गेले होते. परंतु आता या देशांमध्ये जाण्याच्या बुकिंग्समध्ये 50% पेक्षा अधिक घट झाली आहे.
‘चायना मेड’ हत्यारे फेल, पाकिस्तानचे अब्जावधी बुडाले.. ऑपरेशन सिंदूरचं आणखी एक यश
#BoycottTurkey आणि #BanTurkey हॅशटॅग्स ट्रेंडिंग
“अनुपमा” मालिकेतील अभिनेत्री रूपाली गांगुली यांनीही नागरिकांना तुर्कीचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. तर, हिमाचल प्रदेशातील काँग्रेस नेते कुलदीप सिंग राठौर यांनी तुर्कीच्या आयातीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे.