Pravin Tarade यांच्याकडून ‘सफरचंद’ चं कौतुक; पोस्ट करत म्हणाले…

Pravin Tarade यांच्याकडून ‘सफरचंद’ चं कौतुक; पोस्ट करत म्हणाले…

Pravin Tarade : अभिनेते प्रमोद शेलार. संजय जमखंडी, अमिर तडवळकर, शंतनु मोघे आणि अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या ‘सफरचंद’ या नाटकाचे प्रयोग सध्या राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश जोशी यांनी केलं आहे. तर या नाटकाचं नेपथ्य प्रविण भोसले यांनी केलं आहे. त्यांच्या या नाटकाचं कौतुक दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत केलं आहे.

>खिचडी कोणी नासवली हे पुण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

काय म्हणाले प्रविण तरडे?

‘खुप दिवसांनी आज नाटक पाहिलं ‘सफरचंद’. प्रमोद शेलार, संजय जमखंडी, अमिर तडवळकर, शर्मिला शिंदे आणि शंतनु मोघे काय कामं केली येत या कलाकार मित्रांनी. राजेश जोशीच्या दिग्दर्शनाची कमाल सतत जाणवत राहते. मुख्य गोष्टं म्हणजे आपल्याला प्रेक्षक म्हणुन पूर्ण वेळ भारावून टाकतं ते मराठीतील ‘सफरचंद’ नावाचं हे श्रीमंत असं निर्मितीमुल्य नाटक.’

‘हा भ्रष्टाचार नाहीतर शिष्टाचार आहे का?’; कॅगच्या अहवालावर विजय वडेट्टीवारांचा सवाल

पुढे ते म्हणतात ‘आजवर या नाटकाला इतके पुरस्कार का मिळाले? याचं उत्तर नाटक पाहतांना कळतं. कित्येक वर्षात इतकं अफलातून नेपथ्य मी पीहिलच नव्हतं. प्रविण भोसलें याचे नेपथ्यकार आणि एक निर्मातेही आहेत. तुमच्या दुरदृष्टीला सलाम. प्रकाशयोजना डोळे दिपवणारी आहे आणि अंगावर रोमांच उभं करणारं संगीत. प्रमोद आणि संजय माझे तर एकांकिका पासुनचे मित्र मला अभिमान वाटतोय तुमच्या नाटकासाठी असलेल्या समर्पित भावनेचा आणि सातत्याचा. शंतनु आणि शर्मिलाचं जास्तं कौतुक कारण टेलिव्हिजनवर एवढं व्यस्त असताना देखील तुम्ही नाटकाला एवढा वेळ देताय. तो सुध्दा इतक्या दर्जेदार अभिनयातून. अमिर तडवळकर हा सोलापूरच्या नाट्य चळवळीचा चेहरा आणि आवाज होत चाललाय तुझ्या नाटकाविषयीच्या तळमळीला सलाम. नाटकाचा विषय मुद्दामच फोडत नाही तो तुम्ही रंगमंदीरात जावून पाहा. शुभेच्छा मित्रांनो’. असं म्हणत त्यांनी या नाटकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube