खिचडी कोणी नासवली हे पुण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

खिचडी कोणी नासवली हे पुण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Vijay Vadettiwar on Ajit Pawar : खिचडी शिजवली, खिचडी नासवली हे पुण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अजून ते राष्ट्रीय नेते नाहीत. त्यांचा कोणाता पक्ष आहे ते त्यांना माहित नाही. पक्षाचे आमदार किती आहेत हे माहित नाही. त्यांना देशाच्या राजकारणारवर बोलणं म्हणजे अपरिपक्वतेचं लक्षण आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला ‘राजकीय खिचडी’ म्हटले होते.

वडेट्टीवार म्हणाले की अजित पवार हे राज्यस्तरीय नेते आहेत पण कोणत्या पक्षाचं नेतृत्व करतात हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. माझ्या माहिती प्रमाणे अजितदादा राष्ट्रीय नेते झालेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील भाष्य कोणत्या अधिकारात करत आहेत? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.

जनतेचा राग मतपेट्यांमधून दिसत नाही, तोपर्यंत….; राज ठाकरे सरकारविरोधात आक्रमक

भाजपप्रणित एडीएने देशात 38 पक्षांची मोठ बांधली आणि महाराष्ट्रात कोणत्या पक्षाने राजकीय खिचडी शिजवली आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. देशात वेगवेगळ्या 38 पक्षांचे नेते एकत्र आले आहेत, त्यामध्ये काहींचे आमदार-खासदार देखील नाहीत. मग ही खिचडी कोणी केली? याचे उत्तर अजित पवारांनी द्यावं, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ज्या राजकीय विचारधारेला विरोध केला, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा लोकांना सोबत घेऊन राक्षसी महत्वाकांक्षेला खातपाणी भाजपने घातले आहे. अनेक राज्यातील सरकारे पाडली. दुसऱ्या पक्षांना आणि आमदारांना फोडून खिचडी शिजवण्याचे काम कोण करत आहे हे देशातील जनतेला माहिती आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

‘मातोश्रीवर बसून कारभार म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकणं’; जोगेंद्र कवाडेंची सडकून टीका

मणिपूर जळत असताना तिथल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी भाजप इतर पक्षातून आलेल्या आमदारांना सोबत घेत होते. इतर पक्षातून आलेल्या मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत होतं. हे या देशाचं दुर्दैव आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube