‘मातोश्रीवर बसून कारभार म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकणं’; जोगेंद्र कवाडेंची सडकून टीका
Jogendra Kawade : मातोश्रीवर बसून कारभार पाहणं म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकणं, अशी सडकून टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. कवाडे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
धक्कादायक! मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर बिबट्याचा हल्ला, नगरमध्ये खळबळ
जोगेंद्र कवाडे म्हणाले, आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं पण ते लोकाभिमुख नव्हतं. मुख्यमंत्री निवासात मुख्यमंत्र्यांनी कारभार करायला हवा होता. पण तसं न होता, मातोश्रीवर बसून कारभार म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होय, असं जोगेंद्र कवाडे म्हणाले आहेत.
शरद पवारांचा फोटो लावणारच, अजित पवार गटाची ठाम भूमिका
तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गतीमान सरकार आहे. आम्ही सरकारमध्ये नसलो तरी आम्ही समन्व्य समिती तसेच निर्णय प्रक्रियेत आहोत. सत्तेत वाटा मिळाला नाही तरी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करणार नसल्याचं कवाडेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सक्षम सरकार आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आघाडीचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले आहेत.
Ghoomar: क्रिकेटर अजिंक्य रहाणे अन् हर्षा भोगले यांच्याकडून ‘घूमर’ टीमचं विशेष कौतुक !
शिंदेंचे सरकार आल्याने काहीजण सत्तेमधून दूर गेले आहेत. त्यामुळे ते टीका करीत आहेत. टीका-टीपण्णी सुरूच असते मात्र विकासकामांमध्ये विरोध नको. महाविकास आघाडी सध्या वैफल्यग्रस्त आहे, त्यामुळे टिका-टिप्पणी सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केले, तेव्हा त्यांना खोक्याची भाषा केली मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा ओरडणारे गप्प का झाले? असा खोचक सवाल उपस्थित करीत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
अभिनेत्री झरीन खान रुग्णालयात दाखल, ‘या’ आजाराची लागण झाल्यानं चाहते चिंतेत
दलित अत्याचार रोखण्यासाठी समिती :
महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सरकार कितीही बदलली तरीही दलितांवरील अन्यायाच्या घटना कमी झालेल्या नाहीत. अहमदनगर जिल्हा तर अत्याचार पीडितच आहे. अॅट्रॉसिटी कायद्याचा गुन्हेगारांना धाक उरलेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली दलित अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी समिती नेमणार असल्याचं कवाडे म्हणाले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता खोक्याची भाषा कोणी बोलत नाही, खोक्याची संस्कृती महाराष्ट्राची नाही. सत्तेत असताना उद्धव ठाकरे त्यांच्या आमदारांनाही भेटत नव्हते. त्यांच्याकडून आमदारांना अहंकाराच्या भाषेत बोललं जात असल्याचा आरोपही कवाडे यांनी यावेळी केला आहे.