शरद पवारांचा फोटो लावणारच, अजित पवार गटाची ठाम भूमिका

  • Written By: Published:
शरद पवारांचा फोटो लावणारच, अजित पवार गटाची ठाम भूमिका

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. . त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेंकावर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही शरद पवारांनी दिलेला आहेत. त्यानंतर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो वापरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी ठाम भूमिका जाहीर केली आहे. यावरून दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

Prithvi Shaw : धावांचा पाऊस पाडणारा पृथ्वी शॉ वनडे कपमधून बाहेर

शरद पवारांचा फोटो का वापरणार आहे, याचा उत्तर देताना अनिल पाटील यांनी थेट प्रभू श्रीरामाचे उदाहरण दिले आहे. त्याला आता शरद पवार गटाकडून काय उत्तर येते, याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अनिल पाटील हे संचालक असल्याने तेही उपस्थित होते.

BJP कडून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिवराज सिंह यांना डच्चू?

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे आम्हाला पूजनीय व्यक्ती आहेत. त्यांचा फोटो आम्ही लावणारच. फोटो वापरून याबाबत कायद्यात अशी काही तरतूद दिसत नाही. कोणाचा फोटो लावला म्हणून कारवाई झाली, असे कुठेही झाले नाही.

थेट प्रभूश्रीरामाचे उदाहरण देताना मंत्री पाटील म्हणाले, प्रभूश्रीरामाचा फोटो आस्तिक असतील तेही लावतात. नास्तिक असतील तेही लावतात. त्यामुळे नास्तीक व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असे आजपर्यंत झालेले नाही.

आजच शरद पवार यांची सभा बीडमध्ये झाली आहे. त्यानंतर ते जळगावला 4 सप्टेंबर सभा घेणार आहे. यावर मंत्री अनिल पाटील म्हणाले, शरद पवार जळगाव दौऱ्यावर आल्यास त्यांच्या स्वागताचे फोटो आम्हीही लावणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube