कोविड सेंटर घोटाळा; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना 5 दिवसांची पोलिस कोठडी
Sujit Patkar Arrested : जम्बो कोविड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना मुंबई अर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. सुजित पाटकरांना याआधीदेखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. पाटकर यांना कोर्टात हजर करण्यात आलं असून त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संदीप क्षीरसागरांचे प्रमोशन! जिल्ह्याचा नेता म्हणत कौतुक अन् पवारांच्या शेजारची जागाही मिळाली
कोविड घोटाळ्याप्रकरणी नूकतीच ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पाटकर यांना ईडीकडून अटक झाली तेव्हा एका डॉक्टरलाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी कोविड सेंटरमध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. राऊतांचे मित्र पाटकरांनी बनावट कंपनी दाखवून मुंबई कोविड सेंटरचं कंत्राट मिळवलं असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं होतं.
‘आम्ही, चांगल्या चांगल्यांना छातीवर घेतलंय’; जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या सभेत फोडली डरकाळी
कोण आहेत सुजित पाटकर?
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर कोविड घोटाळा प्रकरण चांगलंच चर्चेत होतं. त्यानंतर ईडीकडून मुंबईत एकूण 15 जागेंवर छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी सुजित पाटकरांच्या घरी ईडीला अलिबागच्या जमिनीच्या व्यवहारांची कागदोपत्रे मिळाली होती. या व्यवहारात सुजित पाटकरांच्या पत्नीसह वर्षा राऊत यांचंही नाव असल्याचं समोर आलं होतं. संजय राऊतांनी पाटकर माझे मित्र असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर ईडीने सुजित पाटकर आणि डॉ किशोर बिसुरे यांना अटक केली होती. किशोर बिसुरे मुंबई महापालिकेचे डॉक्टर असून ते दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे.