Pune News : सोमेश्वर फाउंडेशनच्यावतीने आयोजित कै. आमदार विनायक निम्हण मेमोरियल खुल्या व विविध (Pune News) वयोगटातील एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत 528 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा रविवारी (3 ऑगस्ट) गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच खुल्या व विविध वयोगटातील एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला विविध ठिकाणांहून खेळाडूंकडून उस्त्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.
स्पर्धा 7/8 फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. ही बुद्धिबळ स्पर्धा 8,10,12 व 15 वर्षाखालील गटात पार पडणार आहे. स्पर्धेत आंतराराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी (2113, खुला गट), गौरव बाकलीवाल (2038, खुला गट), विहान शहा (1606, 10 वर्षाखालील), आयुष जगताप (1547, 10 वर्षाखालील), ओम रामगुडे (1709, 12 वर्षाखालील), स्पृहा कासार (1547, 12 वर्षांखालील), लथिक राम (1797, 15 वर्षांखालील), भुवन कोनूर (1632, 15 वर्षांखालील) हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत. एफएस गुरुजीत सिंग हे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याचे सनी निम्हण यांनी नमूद केले.