सिया गोयलच्या वडिलांना ‘हा’ दुटप्पीपणा…, पत्रकार परिषदेत केतन अग्रवालच्या वडिलांनी सगळच सांगितलं

आज विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

News Photo   2026 07 17T160727.093

सिया गोयलच्या वडिलांना 'हा' दुटप्पीपणा..., पत्रकार परिषदेत केतन अग्रवालच्या वडिलांनी सगळच सांगितलं

केतन अग्रवाल याच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. (Agrawal) महिन्याभरात या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. दरम्यान अग्रवाल कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला. केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर विशाल अग्रवाल यांच्या वडिलांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आज विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

विशाल अग्रवाल म्हणाले, सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल हे सिया दोषी असेल तर तिला फाशी द्या, असं सांगत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सियाला वकील पुरवला जात आहे. प्रसंगी वकील बदलतही आहेत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे का? असा प्रश्न विशाल अग्रवाल यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी म्हटलं, ‘ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. ते एकाबाजूला तिला दोषी म्हणतात, दुसऱ्या बाजूला तिला मदतही करत आहेत.

Rakhi Agarwal : मोदी जी न्याय द्या, 20 दिवसात 2 पिढ्या संपल्या अन् राखी अग्रवाल यांचा PM मोदींना पत्र

पुढं बोलताना ते म्हणाले, सियाबरोबर भांडण झालं, असं कधी केतनने सांगितलं नव्हते. पण ती कधी कधी खूप नाराज होते किंवा चिडते. तिचा फोन नेहमी एंगेज असतो, असं तो म्हणायचा. पण मुलांचे काही प्रश्न असतील म्हणून आम्ही याकडं दुर्लक्ष केलं. केतनचीही आम्ही समजूत घालून त्याला शांत राहायला सांगायचो असं ते म्हणाले.

विशाल अग्रवाल पत्रकार परिषदेत भावुक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, आम्ही आमच्या घरासाठी सून आणि मुलासाठी चांगली पत्नी आणण्याचा प्रयत्न केला. पण आमच्याबरोबर जे झालं, ते कुठल्याही बापाबरोबर होऊ नये, अशी माझी प्रार्थना आहे. सियाने आम्हाला स्पष्ट ‘नाही’ म्हणून सांगितलं असतं तर हा प्रसंगच उद्भवला नसता असंही ते म्हणाले.

Exit mobile version