Bapusaheb Pathare News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) धुमशान सुरु आहे. सर्वच उमेदवारांकडून आपापल्या मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांची ताकद वाढलीयं. लोहगावचे माजी उपसरपंच प्रीतम खांदवे-पाटील यांनी बापुसाहेब पठारे यांना जाहीर पाठिंबा घोषित केलायं. खांदवे पाटील यांनी बापूसाहेब पठारे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन आपले समर्थन व्यक्त केलंय.
सतेज पाटलांकडून अपमान झाला का? राजीनामा देणार का? दोन पानी पत्रातून शाहु महाराजांची मांडली भूमिका
लोहगावातून बापुसाहेब पठारे यांना पाठिंबा मिळाल्याने लोहगाव परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाले आहे. यंदाच्या निवडणुकीत जनतेच्या व्यापक समर्थनाने विजय संपादन करण्याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांची पदावर राहायची लायकी आहे का? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी तनपुरे भडकले
यावेळी बोलताना खांदवे -पाटील म्हणाले की, बापूसाहेब पठारे हे एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत व पुढेही होतील अशी आम्हाला खात्री असल्याचा विश्वास खांदवे पाटलांनी व्यक्त केलायं. तर पाठिंबा मिळाल्यानंतर पठारे
यांनी लोहगावच्या जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच कार्यरत होतो व या पुढेही असेन व त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला आहे.
आता कुठे तरी थांबलं पाहिजे; नातवाच्या ‘स्वाभिमान’ सभेत पवारांचे निवृत्तीचे संकेत
दरम्यान, बापूसाहेब पठारे यांना मतदारसंघातून पाठिंबा वाढत असून प्रीतम खांदवे -पाटील यांचा पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पाठिंब्यामुळे लोहगाव परिसर व वडगावशेरी मतदारसंघात आघाडीला अधिक बळकटी मिळाली असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.