Walmik Karad Surrender To CID In Santosh Deshmukh Murder : महाराष्ट्रातील बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Santosh Deshmukh Murder) याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलंय. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी करावर आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी सरकारवर दबाव होता. कराड (Walmik Karad) हे धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. याप्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.
गुन्हेगारी घटनांनी गाजलेल्या बीडचा पालकमंत्री कोण? ‘या’ नेत्याला मिळणार जबाबदारी
वाल्मिक कराडच्या सरेंडरची स्टोरी जाणून घेऊ या. पुण्यातील सीआयडी कार्यालयात आज वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलंय. यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवीन वळण (Beed News) आलंय. कार्यकर्त्यांचा जमाव शांत झाला, त्यानंतर बंदोबस्त कमी करण्यात आला. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून वाल्मिक कराडला सीआयडी कार्यालयामध्ये दाखल करण्यात आलंय.
कराडच्या आत्मसमर्पणाबाबत पोलिसांना कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे सुरक्षा बंदोबस्त कमी करण्यात आला होता, अशी माहिती मिळतेय. त्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी देखील त्या परिसामधून निघून गेले होते. त्यामुळे आज वाल्मिक कराड हे शरण येतील, अशी शक्यता कमी होती. त्यानंतर मात्र अचानक एका पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून कराड येताना दिसला. पोलिसांनी गेटवरच त्याला ताब्यात घेतलं अन् सीआयडी कार्यालयात नेलं. त्यावेळी कराडसोबत बीडचे दोन नगरसेवक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
महाराष्ट्रभर चर्चेत असणारा हा वाल्मिक कराड आहे तरी कोण?, धनंजय मुंडेंशी कसे आहेत संबंध?
वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलंय. त्यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या नेतृत्वाखाली कराडचे चौकशी सत्र सुरू झालेय. कराडसोबत जे नगरसेवक उपस्थित आहेत, त्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळतेय. कराडने सरेंडर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सीआयडी कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कर्यात आलाय. सीआयडी कार्यालयाच्या परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाने बंदोबस्त वाढवला.
आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात वाल्मिक कराडचा सहभाग महत्त्वाचा मानला जातोय. सीआयडी कार्यालयामध्ये कराडची चौकशी सुरू आहे. पुढील तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येतील, अशी दाट शक्यता वर्तवली जातेय.