Water discharge from Khadakwasla any time warning issued to residents living along the riverbank : राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यासह मुंबई सारख्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं हे 80 टक्के भरल्याचं चित्र आहे. यामध्ये पुण्यातील खडकवासला धरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
खडकवासलातून कधीही विसर्ग होणार…
खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून खडकवासला धरण जलाशय आज दिनांक 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता ७६% टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारा येवा पाहता येत्या काही तासांत धरण 80% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पार्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
सोने 20% घसरले तरी बँकांचे पैसे का बुडत नाहीत?; CRISIL ने उलगडले गोल्ड लोनचे संपूर्ण गणित
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती. माहिती साठी सविनय सादर. असे निवेदन खडकवासला पाटबंधारे विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जारी केले आहे.
