Vijay Shivatare : सगळे प्रकल्प बारामतीलाच का?

पुणे : बारामती येथे केंद्र शासनाच्या माध्यतातून ESIC हॉस्पिटल (ESIC Hospital) मंजूर झाले. याचसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare)  यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पत्र लिहित अनेक सवाल केले. दरम्यान, त्यांनी हे हॉस्पिटल दौंड, भोर, पुरंदर किंवा हवेली या तालुक्यात करावे, अशी विनंतीही केली. शिवतारे यांनी पत्रात लिहिलं की, केंद्र आणि […]

WhatsApp Image 2023 02 07 At 19.19.51 (1)

WhatsApp Image 2023 02 07 At 19.19.51 (1)

पुणे : बारामती येथे केंद्र शासनाच्या माध्यतातून ESIC हॉस्पिटल (ESIC Hospital) मंजूर झाले. याचसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare)  यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पत्र लिहित अनेक सवाल केले. दरम्यान, त्यांनी हे हॉस्पिटल दौंड, भोर, पुरंदर किंवा हवेली या तालुक्यात करावे, अशी विनंतीही केली.

शिवतारे यांनी पत्रात लिहिलं की, केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व प्रकल्प तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघातील फक्त बारामती तालुक्यात हवे असतात. त्यातला हा नवीन प्रकल्प बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर, वेल्हा, मुळशी, हवेली, खडकवासला एवढे पर्याय उपलब्ध असताना केवळ बारामतीचा हट्ट का हे मला कळत नाही? बारामती हे पुणे जिल्ह्याचे दक्षिणेकडील सर्वात शेवटचे टोक आहे. चाकण किंवा भोर येथील औद्योगिक वसाहतीत काम करणारा एखादा कामगार या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी १४० किलोमीटर दूर यावा अशी आपली अपेक्षा आहे काय? त्याच्या नातेवाईकांनी त्याला भेटण्यासाठी शेकडो किलोमीटर फिरावे का ? असे खडे सवाल माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंना केले.

पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या भोर, पुरंदर किंवा दौंड तालुक्यात हे रुग्णालय केल्यास ते संपूर्ण जिल्ह्याला फायदेशीर ठरेल. या हॉस्पिटलसाठी आवश्यक सर्जन किंवा तज्ञ वैद्यकीय व्यावसायिक है पुण्याच्या परिसरात उपलब्ध आहेत. त्यांना सातत्याने बारामतीला ये जा करण गैरसोयीचे आहे. अनेक सर्जन हे शहरातील विविध हॉस्पिटल्समध्ये उपचारांसाठी जात असतात. अशा वेळी बारामती है गैरसोयीचे ठरणार असून त्यांची मोठी अडचण होऊ शकते. निदान रुग्ण आणि वैद्यकीय व्यावसायिक यांची अडचण लक्षात घेऊन तरी आपण आपला केवळ बारामतीचा विकास करण्याचा मोह आवरायला हवा, असं शिवतारेंनी आपल्या पत्रात लिहिलं.

शिवतारेंनी पुढं लिहिलं की, मागील ५० वर्षात आपण या तालुक्यांमध्ये कुठलाही मोठा प्रकल्प दिला नाहीत. बारामतीत शेकडो कोटी खर्चून आपण मेडिकल कॉलेज मंजूर केलेत. बाजूलाच ५०० बेडचे आणखी एक रुग्णालय आहे. याशिवाय सिल्व्हर जूबिली सारखे उपजिल्हा रुग्णालय आहे. सर्व शासकीय वैद्यकीय सुविधा केवळ एकाच तालुक्यात, तेही एकाच शहरात ही मानसिकता योग्य नाही
दौंड, भोर, पुरंदर किंवा हवेली तालुक्यात जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे. आपण आपल्या बारामती केंद्रित राजकारणाला मुरड घालावी आणि हे हॉस्पिटलवर नमूद तालुक्यांमध्ये कुठेही करावे, अशी विनंती शिवतारेंनी केली. त्यानिमित्ताने केवळ हॉस्पिटलच नव्हे तर तालुक्यांच्या परिसरात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

 

Exit mobile version